21 January 2021

News Flash

आमिर खानच्या मुलीने पोस्ट केला बिकिनी लूकमधला हॉट फोटो

आपल्या सर्वांना कधीतरी ब्रेक लागतोच....

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खान नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरुन ती नेहमीच व्यक्त होत असते. इराने आता स्विमिंग पूलमधला तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. इराने तिचा बिकीनी लुकमधला हॉट फोटो पोस्ट केला आहे.

“मला अजून बरेच काही करायचे आहे. पण काही वेळा तुम्हाला तुमच्यासाठी ब्रेक लागतो. तुम्ही तुम्हाला दिलेली आश्वासन पूर्ण करणं आवश्यक असतं. आता मी परतली आहे. थांबल्याबद्दल धन्यवाद” असे इरा खानने या फोटोला कॅप्शन दिले आहे.

आपल्या सर्वांना कधीतरी ब्रेक लागतोच. ब्रेक लागत नाही ? असे इराने दुसऱ्या फोटोला कॅप्शन दिले आहे. बाथटबमध्ये पुस्तक वाचतानाचा हा फोटो आहे.

आमिर खानला पहिली पत्नी रीना दत्तापासून दोन मुले आहेत. जुनैद आणि इरा खान. इरा अलीकडेच मुंबईतील तिच्या नव्या घरी रहायला गेली. एकटे राहण्याचा अनुभव तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

मागच्या महिन्यात ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या (World Mental Health Day) निमित्ताने तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ती देखील कधीकाळी नैराश्यामध्ये होती असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. परंतु इतक्या श्रीमंत घरात जन्माला आलेली इरा नैराश्येमध्ये का होती? असा प्रश्न सर्वांनाच सतावत होता. त्या प्रश्नाचं उत्तर तिने दिलं होतं. १४ वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. असा खळबळजनक खुलासा तिने केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 6:36 pm

Web Title: ira khan has a lot to do posted her bikini look photo dmp 82
Next Stories
1 ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत होणार विशाल निकमची एण्ट्री
2 अपूर्वा देणार ‘फ्रि हिट दणका’
3 ‘आदित्य १० वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता’; उदित नारायण यांचा खुलासा
Just Now!
X