01 March 2021

News Flash

‘व्हॅलेन्टाईन डे’ला इरा खानला बॉयफ्रेंड कडून मिळाले ‘हे’ गिफ्ट

पाहा फोटो

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान तिच्या फिटनेस प्रशिक्षकामुळे चर्चेत होती. इराने व्हॅलेंटाइन वीकमधील ‘प्रॉमिस डे’चे निमित्त साधत सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. तर व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने इराने तिच्या व्हॅलेन्टाईनचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इरा आणि तिचा फिटनेस प्रशिक्षक नुपूर शिखरे हे रिलेशनशिपमध्ये आहेत.

इराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडीओ शेअर केले होते. त्यातल्या एका व्हिडीओत इराच्या हातात लाल गुलाब असून समोर लाल रंगाचे फुगे आहेत. “त्याने हे बनवले” अशा आशयाचे कॅप्शन इराने त्या व्हिडीओला दिले आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत नुपूर एका खुर्चीवर बसला असून “माझ्यासोबत घरी थांब” असे कॅप्शन इराने त्या व्हिडीओला दिले आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये इरा दिसत नाही. या व्हिडीओत नुपूरने लाल रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे.

इराने व्हॅलेंटाइन वीकमधील ‘प्रॉमिस डे’चे निमित्त साधत सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. या पोस्टमध्ये नुपूरसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत “तुला वचन देणे हे माझे सौभाग्य आहे” अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्याचसोबत तिने हॅशटॅग myvalentine असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

नुपूर हा इराचा फिटनेस प्रशिक्षक आहे. हे दोघे एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात. दोघांनी अनेक वेळा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या आधी इरा मिशाल कृपलानीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र २०१९ मध्ये त्यांच्या ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे. इरा ही आमिर खान आणि रीना दत्ता यांची धाकटी मुलगी आहे. इरा या आधी तिच्या डिप्रेशनच्या बातमीमुळे चर्चेत आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 4:27 pm

Web Title: ira khan shared some clips from her valentine celebration dcp 98 avb 95
Next Stories
1 राजकुमार रावच्या सिनेमाचं नाव बदललं; आता फक्त ‘रुही’ येणार भेटीला
2 अण्णा नाईक परत येणार…!!
3 …म्हणून लग्नाआधी केली होती निकची हेरगिरी, प्रियांकाचा खुलासा
Just Now!
X