अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या स्टार किडने बॉलिवूडमध्ये अद्याप पदार्पण केलेलं नाही. मात्र तिची फॅन फॉलोइंग कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्ट करत असते. अलिकडेच तिने ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या (World Mental Health Day) निमित्ताने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमुळे काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. शिवाय तिच्या डिप्रेशनची खिल्ली देखील उडवली. परिणामी संतापलेल्या इराने आता या ट्रोलर्सविरोधात थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

अवश्य पाहा – एकाच वेळी ‘ती’ दोघांना करत होती डेट; ‘बिग बॉस’मध्ये झाला डबल डेटिंगचा भांडाफोड

“त्या व्हिडीओवरुन माझ्या मानसिक स्थितीवर भाष्य करु नका. तुम्ही अशा प्रकारच्या कॉमेंट करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. जर तुम्ही अशा प्रकारचं ट्रोलिंग सुरु ठेवलं तर मी तुमचे कॉमेंट डिलिट करेन. आणि त्यानंतरही तुम्ही अशा अश्लिल कॉमेंट करणं सुरुच ठेवलं तर मात्र मी कायदेशीर कारवाई करेन.” अशा आशयाची पोस्ट लिहून इराने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

अवश्य पाहा – माधुरीला वाचवण्यासाठी आमिताभ-गोविंदा यांनी गुंडांसोबत केली होती फाईट; पाहा व्हिडीओ…

व्हिडीओमध्ये काय म्हणाली होती इरा?

“मी गेल्या वर्षांपासून नैराश्यात आहे. डॉक्टरांच्या मते मी क्लिनिकली ड्रिप्रेस आहे. पण आता मला बरं वाटतंय. नैराश्यात असलेल्या लोकांसाठी मला काहीतरी करायचं आहे. पण काय करायचं ते अद्याप मी निश्चित केलेलं नाही. असो, पण तुम्ही आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करु नका. शरीरासोबतच मनाला देखील तंदुरुस्त करण्यासाठी काम करा.” अशा आशयाचा इन्स्टाग्राम व्हिडीओ पोस्ट करुन इराने मानसिक स्वास्थ्याचं महत्व समजावून सांगितलं होतं.