जगतसुंदरीचा किताब मिळवणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याची प्रशंसा करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात. निळ्या डोळ्यांची ही सुंदरी वयाच्या ४३व्या वर्षीही आपल्या सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडते. आजवर तिच्या सौंदर्याला टक्कर देणारी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आलेली नाही. मात्र, एका मॉडेलच्या फोटोंनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले असून, तिच्या सौंदर्याची तुलना ऐश्वर्याच्या सौंदर्याशी केली जातेय. त्या मॉडलचे सौंदर्य ऐश्वर्या रायपेक्षा लयभारी आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

वाचा : ‘चंद्रमुखी’ आणि ‘पद्मावती’ समोरासमोर येतात तेव्हा..

सोशल मीडियावर एका इराणी मॉडेलचे फोटो जोरात व्हायरल होत आहेत. ही मॉडेल आहे तरी कोण अशीच चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. महलाघा जबेरी असे या सौंदर्यवतीचे नाव आहे. इराणमध्ये जन्मलेली ही मॉडेल आता अमेरिकेत राहते. अनेक सर्वेक्षणांमध्ये जगातील सर्वाधिक सुंदर महिला म्हणून तिची गणती करण्यात आलीय.

वाचा : भोंदूबाबाच्या वेशातील या अभिनेत्याला ओळखलंत का?

इन्स्टाग्रामवर महलाघाच्या हॉट फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेली ही मॉडेल सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यामुळे लाइमलाइटमध्ये आली. इन्स्टाग्रामवर तिचे २.३ मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. तिने आजवर अनेक जाहिरांमध्येही काम केलेय.

https://www.instagram.com/p/BamgyTDgX9K/

https://www.instagram.com/p/Baex_rvA8y6/

https://www.instagram.com/p/BaFL24EgSHe/

https://www.instagram.com/p/BZRadY5AWX9/

https://www.instagram.com/p/BYxTGV0AjLY/

https://www.instagram.com/p/BXllHVyA-ni/