आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा दिवंगत अभिनेता इरफान खान यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण होतंय. बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील इरफान यांनी त्यांच्या अभिनयाची जादू दाखवली होती. इऱफान यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

इऱफान खान यांची त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधी एक ट्विट केलं होतं. 12 एप्रिलला इरफान यांनी केलेलं हे ट्विट त्यांचं अखेरचं ट्विट
ठरलं. या ट्विटमध्ये शेवट्या दिवसांमध्ये त्यांची मनस्थिती कशी होती हे समजतंय. इरफान खान यांचा शेवटचा सिनेमा 13 मार्चला रिलीज झाला होता. नेहमीप्रमाणाचे या सिनेमात त्यांनी दमदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिकंली होती. कॅन्सरवर मात करत इरफान यांनी या सिनेमातून वापसी केली होती. या सिनेमाती भूमिकेचा एक संवाद शेअर करत त्यांनी अखेरचं ट्विट केलं होतं.

Uddhav Thackeray On BJP and Shinde group
उद्धव ठाकरेंची भाजपा आणि शिंदे गटावर टीका; म्हणाले, “थापाड्यांची खोटारड्यांची लंका…”
amravati lok sabha seat, Navneet Rana, Ravi Rana, Abhijeet Adsul , Support from Abhijeet Adsul, Lok Sabha Election, Navneet Rana visited Abhijeet Adsul home, Navneet Rana and Ravi Rana, amravati news, lok sabha 2024, poitical news,
मनधरणीचे प्रयत्न… नवनीत राणा यांनी अभिजीत अडसूळ यांची घेतली भेट, पण…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Devendra Fadnavis slams jayant patil
“जयंत पाटील नाराज…”, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे नाव घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

या ट्विटमध्ये इरफान यांनी त्यांचा एक फोटो शेअर केला होता. यात ते म्हणाले होते, ” मिस्टर चंपकची मन:स्थिती अशी आहे.” तर त्यांनी शेअर केलेल्या फोटोवर लिहलं होतं. “आतून मी खूप भावूक आहे पण बाहेरून मी खूप आनंदी आहे.” असं ते म्हणाले होते. यावरून त्यांच्या शएवटच्या दिवसांमध्ये ते अनेक भावनिक चढउताराचा सामना करत असल्याचं दिसून येतंय.

इरफान खान यांनी मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्यांनी सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेले . २०१९ मध्ये परतल्यानंतर त्यांनी ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खान यांचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.