‘आयर्नमॅन’ फेम रॉबर्ट डाऊनी ज्युनियर जगातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. नुकताच रॉबर्टचा ५५वा वाढदिवस होऊन गेला. चाहत्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र यंदाचा वाढदिवस रॉबर्टसाठी आनंददायक नव्हता. याचं एकमेव कारण म्हणजे करोना व्हायरस. रॉबर्टचे लाखो चाहते आज करोनाशी झुंज देत आहेत. त्यामुळे ‘आयर्नमॅन’ आपल्या वाढदिवशीसुद्धा आनंदी नव्हता.
रॉबर्ट डाऊनी ज्युनियर उर्फ आरडीजे याने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शुभेच्या देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानले. मात्र या पोस्टमध्ये त्याने एक धक्कादायक बातमी देखील दिली. करोना विषणाणूमुळे त्याच्या एका खास मित्राचं निधन झालं आहे.
“माझ्यावर भरभरुन प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. परंतु या वाढदिवशी मी आनंदी नाही. कारण मागच्याच आठवड्यात माझा खूप जवळचा एक मित्र करोना विषाणूमुळे मी गमवला आहे.” अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहून त्याने सर्वांना करोनापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. आरडीजेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जगभरातील लाखो चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अनेकांनी त्याच्या मित्राला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2020 11:31 am