27 September 2020

News Flash

‘सोशल मीडियावरील चर्चांचा ‘पहरेदार पिया की’ला फटका’

इतक्या बेजबाबदारपणे मतं मांडू नयेत

पहरेदार पिया की

मुंबईमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसासोबतच आणखी एक चर्चा सध्या सुरु आहे ती म्हणजे ‘पहरेदार पिया की’ या मालिकेविषयी. बऱ्याच चर्चा, विरोध आणि याचिका दाखल केल्यानंतर ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मालिकेच्या कथानकाच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच चर्चांना उधाण आल्यामुळे माहिती व प्रसारण मंत्रालयापर्यंत ही बाब पोहोचली होती. १० वर्षांच्या एका मुलाचं १८ वर्षांच्या मुलीसोबत लग्न लावून देण्याचं कथानक या मालिकेमध्ये दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे बालविवाहाच्या प्रथेचाच ही मलिका प्रसार करत आहे असा आरोपही या मालिकेवर लावण्यात आला होता. सरतेशेवटी ‘सोनी’ वाहिनीवरील ही मालिका बंद करण्याचे आदेश स्मृती इराणी यांच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. शुक्रवारी या मालिकेचा शेवटचा भाग दाखविण्यात आला.

मालिकेला होणारा विरोध आणि अचानक अशा प्रकारे मालिका बंद करण्यात आल्यामुळे त्यातील कलाकार आणि निर्मात्यांची निराशा झाली आहे. या सर्व परिस्थितीविषयी अधिक माहिती देत ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना ‘पहरेदार…’चे निर्माते सुमित मित्तल म्हणाले, ‘मालिका सुरु झाल्यापासून त्याविषयीच्या बऱ्याच चर्चा सुरु झाल्या. या चर्चा आणि याचिकांचा मालिकेवर काहीच परिणाम होणार नाही अशी आम्हाला आशा होती. बीसीसीसीने ज्यावेळी मालिकेच्या प्रसारणाची वेळ बदलली तेव्हाही आमची निराशा झाली होती. या सर्व परिस्थितीबद्दल नुकतीच आमची वाहिनीशी संलग्न व्यक्तींसोबत चर्चाही झाली होती.’

दरम्यान, ही मालिका बंद करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे परिस्थिती चिघळली. पण, वाहिनीने निर्मात्यांची बाजू धरुन घेतल्यामुळे आपल्याला दिलासा मिळाल्याचंही सुमितने स्पष्ट केलं. ‘मंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय त्याविषयी मला काहीच बोलायचं नाहीये. पण, मला एक गोष्ट सांगायची आहे की, वाहिनीतर्फे आम्हाला त्याच वेळेत एक नवीन कार्यक्रम सादर करण्याची ऑफर दिली आहे. ही खरंच प्रशंसनीय बाब आहे. आमची सध्याची टीम पाहता लवकरच एखाद्या चांगल्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही एकत्र येऊ’, असं सुमित मित्तल म्हणाले.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

‘पहरेदार पिया की’च्या विरोधात इतक्या चर्चा होण्याचं नेमकं कारण विचारलं असता सुमित मिश्किलपणे हसत म्हणाले, ‘माझ्यामते प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण, इतक्या बेजबाबदारपणे मतं मांडू नयेत. एखाद्या मालिकेत बऱ्याच लोकांची मेहनत असते. त्यामुळे फक्त एका प्रोमोमुळे आणि एखाद्या दृश्यामुळे तुम्ही अंदाज नाही लावू शकत. या मुद्द्यात मालिकेच्या प्रेक्षक वर्गाकडेही लक्ष दिलं पाहिजे. सोशल मीडियावर इतरांना ट्रोल करणारे आणि उगाचच्या चर्चांना हवा देणारे लोक या मालिकेच्या प्रेक्षकवर्गात मोडत नाहीत.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 9:58 pm

Web Title: irresponsible social media buzz caused end of hindi serial pehredaar piya ki says producer sumeet mittal
Next Stories
1 ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला बिग बींनी लिहिलं पत्र
2 सोनाक्षी कोणाला जीवे मारण्याचा बेत आखतेय?
3 संजय दत्तच्या मुलीची ‘ही’ ओळख तुम्हाला माहितीये का?
Just Now!
X