02 December 2020

News Flash

‘चला हवा येऊ द्या’मध्ये ‘मदारी’चा खेळ

बॉलीवूड अभिनेता इरफान खाननेही झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली

बॉलीवूड अभिनेता इरफान खाननेही झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली. इरफान खान याचा ‘मदारी’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सोमवार, १८ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता इरफानच्या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.
‘हासिल’, ‘मकबूल’ ‘पीकू’, ‘तलवार’ आदी हिंदी तर ‘लाइफ ऑफ पाय’, ‘स्पायडर मॅन’, ‘ज्युरासिक वर्ल्ड’ आदी हॉलिवूड चित्रपटांतूनही त्याच्या अभिनयाचा वेगळा पैलू प्रेक्षकांनी पाहिला आहे. ‘मदारी’चे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले आहे. इरफानसह ‘मदारी’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले तुषार दळवी व उदय टिकेकर या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
‘चला हवा येऊ द्या’च्या सोमवारी प्रसारित होणाऱ्या भागात इरफान खानच्या ‘बिल्लू’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’ या गाजलेल्या चित्रपटांची केलेली नक्कल पाहायला मिळणार आहे. एका माकडाने लिहिलेले पत्र, पोस्टमन काका या वेळी वाचून दाखविणार आहेत. मदारी आपल्या तालावर माकडाला नाचवितो आणि लोकांचे मनोरंजन करतो. पण सद्य परिस्थितीत माणूस व्यवस्थेच्या हातातील बाहुले बनला असून ही व्यवस्था त्याला आपल्या तालावर नाचवीत असल्याचा आशय या पत्रात मांडण्यात आला आहे.

‘खुलता कळी खुलेना’
झी मराठी वाहिनीवर १८ जुलैपासून ‘खुलता कळी खुलेना’ ही नवी मालिका सुरू होत आहे. सोमवार ते शनिवार या दिवशी दररोज रात्री साडेआठ वाजता या मालिकेचे प्रसारण होणार आहे. उषा नाडकर्णी, सविता प्रभुणे, संजय मोने, लोकेश गुप्ते, मानसी मागीकर, आशा शेलार, शर्वरी लोहकरे, डॉ. विक्रांत दळवी, अभिज्ञा नाईक, मयूरी देशपांडे आदी कलाकार मालिकेत आहेत. मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 12:32 am

Web Title: irrfan khan great time on the sets of chala hawa yeu dya
Next Stories
1 श्रीदेवीच्या गाण्यांवर माधुरीचा नाच!
2 चित्ररंग : कोहमपर्यंत नेणारा प्रवास
3 चित्ररंग : उथळ पाण्याला खळखळाट फार
Just Now!
X