07 July 2020

News Flash

…म्हणून इरफान दिसला व्हिलचेअरवर

विमानतळावरील त्याचे फोटो पाहून चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या फोटोमध्ये व्हिलचेअरवर बसलेला इरफान त्याचा चेहरा लपवत होता.

इरफान खान

अभिनेता इरफान खान अखेर मुंबईत परतला असून विमानतळावर त्याला व्हिलचेअरवर पाहिलं गेलं. इरफानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली. मात्र लंडनमधील शूटिंग संपल्यानंतर इरफान शस्त्रक्रिया झाल्याने तो व्हिलचेअरवर असल्याचं त्याच्या जवळच्या व्यक्तींकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षी इरफानला न्यूरोएंडोक्राइन ट्युमर निदान झाल्यानंतर लंडनमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारानंतर त्याने आगामी ‘अंग्रेजी मिडियम’ या चित्रपटाच्या शूटिंगलादेखील सुरुवात केली होती. तिथले शूटिंग संपल्यानंतर इरफानवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

”लंडनमधील शूट संपल्यानंतर इरफानला घरी परतायचे होते. मुंबईत तो काही दिवस राहणार आहे. इरफानच्या स्वास्थ्यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. पण त्याच्या तब्येतीविषयी कोणतीही चुकीची माहिती पसरवू नका,” अशी विनंती इरफानच्या जवळच्या व्यक्तीकडून करण्यात आली आहे.

बॉलिवूडचा दमदार अभिनेता लवकरच रुपेरी पडद्यावर परतणार असल्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. उपचार पूर्ण झाल्यानंतर इरफानने ‘अंग्रेजी मिडियम’ या चित्रपटाला होकार दिला होता. हा ‘हिंदी मिडियम’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. मात्र याची कथा पूर्णपणे वेगळी असणार आहे. यामध्ये करीना कपूर इरफानसोबत झळकणार आहे. पडद्यावर ही नवीन जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकसुद्धा उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 11:25 am

Web Title: irrfan khan in mumbai after surgery in london ssv 92
Next Stories
1 विनोदाचे वारकरी
2 रंग आमुचा वेगळा..
3 ‘घराणेशाही ही खरं तर जबाबदारीच’
Just Now!
X