13 August 2020

News Flash

Photo : चेहरा झाकून व्हिलचेअरवर दिसला इरफान; चाहत्यांमध्ये संभ्रम

उपचारानंतर इरफान भारतात परतला आहे.

इरफान खान

जवळपास वर्षभर कॅन्सरवरील उपचार घेतल्यानंतर अभिनेता इरफान खान पुन्हा एकदा कामावर रुजू झाला. गेल्या वर्षी त्याला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचं निदान झालं होतं. इरफान लवकरात लवकर बरा होऊन रुपेरी पडद्यावर परतावा अशी चाहत्यांची इच्छा होती. काही दिवसांपूर्वीच त्याने लंडनमध्ये आगामी ‘अंग्रेजी मिडियम’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. आता ही शूटिंग संपवून तो भारतात परतला आहे. पण विमानतळावरील त्याचे फोटो पाहून चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

या फोटोमध्ये व्हिलचेअरवरील इरफान चेहरा लपवताना दिसत आहे. प्रसारमाध्यमांसमोर येऊ नये अशी त्याची कदाचित इच्छा असावी. पण तो व्हिलचेअरवर का आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. इरफान अजूनही पूर्णपणे बरा झाला नसल्याचा अंदाज नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.

irrfan छायासौजन्य- पिंकविला

‘अंग्रेजी मिडियम’ हा ‘हिंदी मिडियम’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. मात्र याची कथा पूर्णपणे वेगळी असणार आहे. यामध्ये करीना कपूर इरफानसोबत झळकणार आहे. पडद्यावर ही नवीन जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकसुद्धा उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 3:38 pm

Web Title: irrfan khan is back to the bay from london post his shoot for angrezi medium ssv 92
Next Stories
1 ‘फत्तेशिकस्त’मुळे ‘गर्ल्स’च्या निर्मात्यांनी घेतला हा मोठा निर्णय
2 ‘बिग बॉस मराठी २’फेम नेहाने स्वच्छ केला समुद्र किनारा!
3 आयुषमानचं खरं नाव माहितीये का?
Just Now!
X