२९ एप्रिल गेल्या वर्षी बॉलिवूडमधील एक सर्वोत्कृष्ट अभिनेता इरफान खानचे निधन झाले होते. colon infection मुळे त्याचे निधन झाले. आज इरफान यांच्या निधनाला १ वर्ष पूर्ण झालं. त्याच निमित्ताने इरफानचा मुलगा बाबिलने रुग्णालयात असताना वडिलांनी कोणती गोष्ट सांगितली याचा खुलासा केला आहे.

‘फिल्म कम्पॅनियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, “त्यांचे निधन होण्याच्या दोन-तीन दिवस आधीपासून मी रुग्णालयात होतो. त्यांना काहीच कळत नव्हतं आणि त्यांनी सगळ्यात शेवटी एक गोष्ट सांगितली..त्यांनी फक्त माझ्याकडे पाहिलं, हसले आणि म्हणाले..’मी मरणार आहे’ आणि मी त्यांना म्हणालो नाही ‘तुम्ही मरणार नाही’. त्यानंतर ते पुन्हा हसले आणि झोपले,” असं बाबिल म्हणाला.

तर, इरफानची पत्नी सुतापा यांनी देखील अनेक गोष्टी सांगितल्या. “मला आवडणारा त्याचा गुण म्हणजे, तो कधी ढोंग करायचा नाही. तो तुमच्यावर रागवला असेल किंवा तो तुमच्यावर प्रेम करत असेल तर त्याने कधीच ते ढोंग केले नाही. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे, जर तो म्हणायचा की मी तुझ्यावर प्रेम करतो याचा अर्थ तो तुमच्यावर खरचं प्रेम करतो. तो कधी खोट बोलला नाही. त्याला जो पर्यंत मना पासून कोणती गोष्ट वाटायची नाही तो पर्यंत तो ती गोष्ट बोलायचा नाही,” असे सुतापा म्हणाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

इरफान खानने ‘तलवार’, ‘पानसिंग तोमर’, ‘पिकू’, ‘लाइफ ऑफ पाई’, ‘हिंदी मीडियम’ इत्यादी सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. इरफान खान एक उत्कृष्ट अभिनेता होता, ज्याच्या अभिनयाला आणि त्याच्यासारख्या व्यक्तीला कोणी विसरणार नाही.