01 December 2020

News Flash

…जेव्हा पत्नीसाठी इरफान गायचा गाणं; पाहा बाबिलने शेअर केलेला ‘हा’ खास व्हिडीओ

पाहा, बाबिलने शेअर केलेला इरफान-सुतापाचा खास व्हिडीओ

आपल्या दमदार अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खान याचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, आजही त्याच्या आठवणींमध्ये अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या होतात. इरफान खान याने आपल्या कामामुळे लोकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. यामध्येच सध्या त्याचा आणि पत्नी सुतापा या दोघांचा गाणं गातानाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ इरफानच्या मुलाने बाबिलने शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये इरफान त्याच्या पत्नीसाठी सुतापासाठी खास गाणं म्हणताना दिसत आहे. सुतापाला विमानतळावर सोडायला जात असताना इरफान तिच्यासाठी गाणं म्हणत होता. मात्र, मध्येच तो गाण्याचे बोल विसरतो आणि मग सुतापा त्याला गाण्यांच्या ओळी सांगते, असं यात दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

Mera saya ki tera saya? Dropping ma off at the airport now 🙁

A post shared by Babil (@babil.i.k) on

इरफान खान आणि त्यांची पत्नी सुतापा सिकंदर यांचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. ८९ हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

दरम्यान, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’,‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्यांनी हॉलिवूडमध्येही छाप सोडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 10:02 am

Web Title: irrfan khan sings song for sutapa sikdar mera saaya tera saaya son babil khan shares video dcp 98
Next Stories
1 महेश भट्ट यांच्या वकिलाने फेटाळले लविनाने केलेले आरोप; म्हणाले…
2 बोल्डनेसमुळे चर्चेत राहणाऱ्या मल्लिकाचं खरं नाव माहित आहे का?
3 ‘माझ्या मृत्यूला महेश भट्ट जबाबदार असेल’; व्हिडीओ शेअर करत तिने केले गंभीर आरोप
Just Now!
X