News Flash

‘तू मूलगी आहेस का?’ असे म्हणत ट्रोल करणाऱ्याला इरफानच्या मुलाचे सडेतोड उत्तर

सध्या बाबिलची ही पोस्ट चर्चेत आहे.

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तो बऱ्याच वेळा वडिलांच्या आठवणीत फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकताच बाबिलने चेहऱ्याला फेसमास्क लावलेला फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे त्याला एका यूजरने ‘मुलगी’ म्हणत ट्रोल केले होते. पण बाबिल देखील शांत बसला नाही. त्याने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

बाबिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी फेसमास्क लावलेला फोटो शेअर होता. हा फोटो शेअर करत त्याने Breakout season असे कॅप्शन दिले होते. त्याच्या या फोटोमुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले. एका यूजरने तर तू मुलगी आहेस का? म्हणत बाबिलची खिल्ली उडवली होती. पण बाबिल देखील शांत बसला नाही. त्याने या ट्रोलरला उत्तर दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

नुकताच बाबिलने या सर्वांना उत्तर देण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने, ‘बाहेर जाण्याआधी मी फेसमास्क किंवा मेकअप करतो. ते पाहून काही लोकांनी मला तू मुलगी आहेस का? असे विचारले. आपल्यातील स्त्रीत्व ओळखणे हिच गोष्ट आपल्याला खरोखर माणूस बनवते’ अशा आशयाचे कॅप्शन देत ट्रोलर्सला सुनावले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

पुढे तो म्हणाला, ‘माझा त्वचेची काळजी घ्यायला मला आवडते. मला सेक्सी दिसायला आवडतं.’

बाबिल सध्या अभिनयाचे धडे घेत आहे. तो त्यासाठी लंडनला गेला आहे. बाबिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण पदार्पणापूर्वीच त्याचा चाहता वर्ग मोठा असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 7:36 pm

Web Title: irrfan khan son babil trolled for apply facemask on face avb 95
Next Stories
1 ‘जंगजौहर’ आता ‘पावनखिंड’, बाजीप्रभूंची शौर्य गाथा उलगडणार
2 ‘गोंधळ..टेंशन आणि तमाशा, ‘गुड बॉय’ येतोय भेटीला
3 ‘कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर मला फोन कर’, सोहेल खान आला राखीच्या मदतीला धावून
Just Now!
X