News Flash

इरफान खान नाशिकमध्ये करणार दिवाळी साजरी

गेल्या सात महिन्यांपासून इरफानवर लंडनमध्ये उपचार सुरू आहेत.

इरफान खान, irrfan khan

अभिनेता इरफान खान लवकरच भारतात परतणार असून यंदाची दिवाळी तो नाशिकमध्ये साजरा करणार आहे. इरफानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर neuroendocrine tumour हा दुर्धर आजार असून लंडनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मार्च महिन्यापासून इरफान लंडनमध्येच असून दिवाळीसाठी तो दहा दिवस भारतात येणार आहे.

नाशिक इथल्या फार्महाऊसमध्ये कुटुंबीयांसोबत इरफान दिवाळी साजरी करणार आहे. दहा दिवसांनंतर तो पुन्हा लंडनला रवाना होणार आहे. इरफान ‘हिंदी मिडियम’ या चित्रपटाच्या सिक्वलच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण शूटिंगसाठी पूर्ण वेळ देण्याला डॉक्टरांकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही. पुढच्या वर्षी मार्चपर्यंत तो पहिल्यासारखं नियमित काम करू शकणार असल्याचं समजतंय.

काही दिवसांपूर्वी ‘हिंदी मिडियम’चे निर्माते इरफानला भेटण्यासाठी लंडनला गेले होते. त्यांनी इरफानला चित्रपटाची कथा ऐकवली आणि त्यानंतर त्याने सिक्वलमध्ये काम करण्यासाठी होकार कळवला. २०१७ साली प्रदर्शित झालेला इरफानचा ‘हिंदी मिडियम’ बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला. यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर इरफानसोबत झळकली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या सिक्वलची चर्चा होती पण इरफानच्या प्रकृतीमुळे सिक्वलमध्ये दुसऱ्या अभिनेत्यासाठी विचार केला जाणार होता. या सिक्वलचं दिग्दर्शन होमी अदजानिया करणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 2:16 pm

Web Title: irrfan khan to celebrate diwali at his farmhouse in nashik
Next Stories
1 #HappyBirthdayVirat : अनुष्कानं मानले देवाचे आभार
2 दिवाळीच्या खरेदीसाठी सिद्धार्थ जाधवची नवी शक्कल
3 प्रियांकाचा ‘पाहुना’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X