News Flash

इरफान खानच्या निधनावर पत्नीची काळजाला भिडणारी पोस्ट

'पुन्हा जगायची संधी मिळाली तर पत्नीसाठी जगेन', असं एकदा इरफान म्हणाला होता

बॉलिवूड अभिनेता इरफान खान याने २९ एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाचं वृत्त समजताच बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. कर्करोगासारख्या असाध्य रोगावर मात करत तो भारतात परतल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक करेल असा विश्वास साऱ्यांनाच होता. मात्र त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. इरफान खान याचं निधन झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अगदी त्याच्या मुलानेही आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर केल्या. यामध्येच इरफान खान याच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

इरफान खान यांनी पूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पत्नी सुतापाविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. अगदी ‘जर पुन्हा जगायची संधी मिळाली तर पत्नीसाठी जगेन’, असं तो म्हणाला होता. यावरुन त्याचं सुतापावर किती प्रेम होतं याचा अंदाज लावता येतो. मात्र इरफान खानला ती संधी मिळाली नाही. त्यापूर्वीच त्याचं निधन झालं. त्याच्या निधनानंतर सुतापाने एक फोटो शेअर करत काळजाला भिडावी अशी कॅप्शन दिली आहे.

 

View this post on Instagram

 

I have not lost i have gained in every which way..

A post shared by Sutapa Sikdar (@_sutapa_sikdar_) on

“मी काही गमावलं नाहीये. मी सारं काही कमावलं आहे”, असं कॅप्शन सुतापाने या फोटोला दिलं आहे. विशेष म्हणजे सुतापाने दिलेली ही कॅप्शन अनेकांच्या काळजाला भिडली आहे. अनेकांनी त्यावर कमेंट करत तिच्या धैर्याला सलाम केलं आहे.

दरम्यान, इरफान खान आजारी असताना त्याच्या प्रत्येक पावलावर सुतापाने त्याची साथ दिली आहे. मुलाखतीत बोलत असतानाही त्याने वारंवार या गोष्टीचा आवर्जुन उल्लेख केला होता. इरफान आणि सुतापा यांनी १९९५ मध्ये लग्न केलं होतं. सध्या इरफानच्या पश्चात त्याची पत्नी सुतापा, दोन मुलं बाबिल आणि अयान आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 2:31 pm

Web Title: irrfan khan wife sutapa shares a picture with late husband write emotional post ssj 93
Next Stories
1 इरफानपुढे शाहरुखचा अभिनयही फिका; पाकिस्तानी अभिनेत्रीने वाहिली आदरांजली
2 Video : ‘त्यांचे पगार कापू नका’ ; कलाकारांचं जनतेला भावनिक आवाहन
3 “…म्हणून ऋषी कपूर यांना भेटायला रुग्णालयात गेलो नाही”; बिग बींनी केला खुलासा
Just Now!
X