अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्याने देशातील हिंदू-मुस्लीम वादावर प्रतिक्रिया दिली आहे. काही राजकीय मंडळी देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात रक्षा बंधनला सुट्टी मिळते पण ईदसाठी नाही. मला देखील त्यांनी देशद्रोही म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता, असे खळबळजन आरोप बाबिलने केले आहेत.

अवश्य पाहा – सुशांत आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीची सर्वोच्च न्यायालयात धाव

बाबिलने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून देशातील धार्मिक तणावावर भाष्य केलं. “मला माहिती आहे संपूर्ण जगातील राजकिय परिस्थिती आता बदलली आहे. पण आपल्या धर्मनिरपेक्ष भारतातही आता धार्मिक तेढ निर्माण केला जातोय. माझ्या मित्रांनी अचानक माझ्यासोबत बोलणं बंद केलय कारण मी विशिष्ट धर्माचा आहे. ज्या मित्रांसोबत मी १२ वर्षांचा असल्यापासून क्रिकेट खेळत होतो ते आता हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख या धर्मांमध्ये विभागले गेले आहेत.”

मृत्यूनंतर सुशांत ट्विटरवर ‘आलिया भट्ट’ला फॉलो करतोय? कंगनाने विचारला प्रश्न

“धार्मिक तणावावर भाष्य केलं की लोक तुम्हाला थेट पाकिस्तानात पाठवायला तयार असतात. तुम्हाला देशद्रोही म्हटलं जातं. पण मी अशा ट्रोलर्सला घाबरणार नाही. मी तर वाटच बघतोय कोण माझ्या पोस्टवर देशद्रोही अशी कॉमेंट करतोय, मला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देतोय. माझं माझ्या देशावर खुप प्रेम आहे. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मला देशद्रोही म्हणण्याचा विचारही करु नका. मी एक बॉक्सर आहे. तुमचं नाक तोडून टाकेन.” अशा आशयाचे तब्बल चार पोस्ट त्याने लिहिल्या आहेत. बाबिल खानच्या या चकित करणाऱ्या पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेत आहेत.