19 September 2020

News Flash

त्यावेळी इरफान खान आणि सुनील शेट्टी माझ्यापाठीशी उभे राहिले- तनुश्री दत्ता

नाना पाटेकरनंतर तनुश्री दत्ता हिनं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवरदेखील गैरवर्तणूकीचे आरोप केले आहे.

२००५ मध्ये 'चॉकलेट : डिप डार्क सिक्रेट' या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शकानं गैरवर्तणुक केल्याचा आरोप तिनं केला.

अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणूकीचे आरोप केल्यानंतर आता तनुश्री दत्ता हिनं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवरदेखील सेटवर गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला आहे. २००५ मध्ये ‘चॉकलेट : डिप डार्क सिक्रेट’ चित्रिकरणावेळी त्यांनी आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचं तिनं म्हटलं आहे. मात्र यावेळी सुनील शेट्टी आणि इरफान खान आपल्या पाठीशी उभे राहिले असं म्हणत तिनं पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

‘चॉकलेट…’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कोणतीही कल्पना न देता मला संपूर्ण कपडे काढून डान्स करण्यास दिग्दर्शकानं (विवेक अग्निहोत्रीनं )सांगितलं. या दृश्यात मी नव्हते तरीही मी अशाप्रकारचा टेक द्यावा अशी सूचना त्यांनी मला केली पण सुदैवानं सुनील शेट्टी आणि इरफान खान त्यावेळी माझ्याबाजूनं उभं राहिले’ असं ती डीएनए या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

तनुश्री दत्ता- नाना पाटेकर यांच्यात नेमकं काय घडलं? वाचा प्रत्यक्षदर्शीचा खुलासा

याआधी तिनं नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. नाना सारख्या महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या लोकांसोबत काम करणं या क्षेत्रातल्या मोठ्या लोकांनी थांबवलं पाहिजे. पण रजनीकांत, अक्षय कुमार यांसारखे कलाकार त्यांच्यासोबत काम करतात हे असंच सुरू राहिलं तर भारतात ‘metoo’ सारखी मोहिम कधीही यशस्वी होणार नाही असंही ती एका मुलाखतीत म्हणाली.

या प्रकरणावर ‘कोणी काय बोलायचं हे आपण कसं ठरवणार, कोणी काहीही म्हटलं तरी मला जे आयुष्यात करायचं आहे तेच मी करणार’ अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 10:16 am

Web Title: irrfan suniel shetty stood up for me said tanushree dutta accused director vivek agnihotri for harassment
Next Stories
1 Video : प्रेमाची अनुभूती देणारं ‘बॉईज २’ मधील रोमॅंटीक गाणं प्रदर्शित
2 तनुश्री दत्तामुळे आली ‘बिग बीं’वर ट्रोल होण्याची वेळ
3 Happy Birthday Lata Mangeshkar:जाणून घ्या, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी ‘या’ गोष्टी
Just Now!
X