News Flash

आमिरने नाक का टोचलं?

उगाच नाही त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात...

सुशांत सिंग राजपूत आणि आमिर खान

आमिर कधी काय करेल काही सांगता येत नाही. प्रत्येक सिनेमातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अधिकाधिक आपलीशी वाटावी म्हणून तो वाटेल ते कष्ट घ्यायला तयार असतो. ‘दंगल’मधलंच बघा ना.. सिनेमासाठी त्याने वजन वाढवलं आणि तेवढंच घटवलंही. त्याच्या या सिनेमाची प्रशंसाही खूप झाली. आमिरचा प्रत्येक सिनेमा प्रेक्षकांना नवीन काहीतरी शिकवून जातो. उगाच नाही त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणतात…

सुशांत सिंग राजपूतने आमिरसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आमिरने नाक टोचलेलं दिसतंय. मुलींना शोभणारी ‘नोज रिंग’ आमिरच्या भारदस्त शरीरावरही तेवढीच चांगली शोभून दिसतेय. पण त्याने हे नाक नक्की कशासाठी टोचलंय ते मात्र अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही. सध्या आमिर ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमाच्या तयारीत व्यग्र आहे. त्याचा हा लूक या सिनेमासाठी आहे की नाही याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत.

याआधीही आमिर पगडी घातलेल्या अवतारात दिसला होता. तेव्हा त्याचा हा पगडीधारी अवतार ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’साठीच आहे, असे आपण समजून बसलो होतो. पण प्रत्यक्षात मात्र त्याचा तो लूक एका जाहिरातीसाठी होता. आमिर त्याच्या सिनेमांसाठी नेहमीच जीवतोड मेहनत करतो, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. कदाचित याचमुळे त्याचा नवीन सिनेमा येणार असतो तेव्हा तो तिकीट बारीवर नवीन रेकॉर्ड करणारच असतो.

आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमाकडूनही त्याच्या चाहत्यांना अनेक अपेक्षा आहेत. तूर्तास, प्रयोगशील आमिरच्या नाकातील ही नोज रिंग तुम्हाला कशी वाटली?

येत्या जूनमध्ये आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. यात आमिरसोबत मेगास्टार अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अर्थात आमिरसोबत कोणती अभिनेत्री दिसेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या या सिनेमासाठी श्रद्धा कपूरसह अनेक अभिनेत्रींची नावे चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 7:48 pm

Web Title: is aamir khan gets his nose pierced for his next
Next Stories
1 उपेंद्रचा मुलगा म्हणतो, ‘बाबा, आपण चाळीत राहूया ना!’
2 VIDEO: राजामौलींच्या ‘महाभारता’मध्ये बिग बी ‘भीष्म’ तर रजनीकांत ‘द्रोणाचार्यां’च्या भूमिकेत?
3 … म्हणून अक्षयकुमार वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात नाही
Just Now!
X