News Flash

अभिषेकसोबत लग्न केल्याचा दावा करणारी ‘ती’ येणार ‘बिग बॉस ११’ मध्ये?

हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा दावा तिने केला

अभिषेक बच्चन- ऐश्वर्या राय बच्चन आणि जान्हवी कपूर

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी २००७ मध्ये लग्न केले. परिकथा वाटणाऱ्या या लग्नात काही आमंत्रित न केलेले पाहुणेही होते. यातील एक पाहुणी म्हणजे जान्हवी कपूर. अभिषेक- ऐश्वर्याच्या लग्नाच्या एक दिवस आधीच जान्हवीचा चेहरा साऱ्यांना दिसला. आता ही जान्हवी पुन्हा एकदा लोकांना टीव्हीवर दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच ती सलमान खानच्या ‘बिग बॉस ११’ या शोमध्ये दिसणार आहे.
‘दस’ या सिनेमात जान्हवी एक बॅकग्राऊंड डान्सर होती. तेव्हा हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा दावा त्यावेळी तिने केला होता. आता आध्यात्मिकतेकडे वळलेली जान्हवी सध्या बिग बॉसच्या घरात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे.

अक्षय कुमार या दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार

नुकताच ‘बिग बॉस’चा एक प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला. यंदाच्या ‘बिग बॉस’ची थीम ‘पडोसी’ असणार आहे. येत्या ऑक्टोबरपासून या रिअॅलिटी शोला सुरूवात होणार आहे. पडोसी या थीममध्ये बिग बॉसचे घर सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिक अशा दोन भागात विभागले जाईल. पाकिस्तानमधून भारतात येण्यासाठी लढा देणारी उझ्मा अहमद हीदेखील या शोचा भाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच वादग्रस्त मॉडेल आर्शी खान आणि एमटीव्ही ‘लव्ह स्कूल २’ मधील हनी कमबोजदेखील या शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

याशिवाय टीव्ही अभिनेत्री वंदना सिंग, निती टेलर, अचिंत कौर, देवोलीना भट्टाचार्जी, राहुल राज सिंग आणि ढिंच्याक पूजा या नावांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 3:48 pm

Web Title: is abhishek bachchans stalker jhanvi kapoor headed to bigg boss 11
Next Stories
1 ढोल-ताशांच्या गजरात सरस्वती करणार बाप्पाचे विसर्जन
2 अक्षय कुमार या दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार
3 ‘पहरेदार पिया की’चे निर्माते घेऊन येताहेत ‘ही’ नवी मालिका
Just Now!
X