21 September 2020

News Flash

‘या’ चित्रपटाच्या दोन आठवड्यांच्या शुटींगसाठी अक्षय घेतोय २७ कोटी रुपये?

या चित्रपटात अक्षय कुमार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची कमाई ४८.५ मिलियन डॉलर (जवळपास ३६२ कोटी रुपये) इतकी असून तो या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमधील एक अभिनेता आहे. तो चित्रपटांच्या प्रॉफिट शेअरमध्ये हिस्सा मागत नासली तरी प्रत्येक चित्रपटासाठी तगडे मानधन घेतो. आता लवकरच अक्षय कुमारचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी अक्षयने घेतलेल्या मानधनाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने २७ कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे. अक्षय कुमारपूर्वी आनंद एल राय यांनी अभिनेता हृतिक रोशनला विचारले होते. पण काही कारणास्तव त्याने नकार दिला. त्यानंतर अक्षय कुमारला विचारण्यात आले आणि चित्रपटाला होकार दिला. या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान आणि धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अक्षय कुमार या चित्रपटासाठी दोन आठवडे चित्रीकरण करणार आहे आणि त्यासाठी त्याने २७ कोटी रुपये मानधन घेतल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटानंतर अक्षय ‘बेल बॉटम’ या चित्रपटासाठी चित्रीकरण करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी तो लंडनला जाणार आहे. त्यानंतर ती ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे चित्रीकरण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2020 1:14 pm

Web Title: is akshay kumar taking whopping amount of twenty seven crores for two week shooting avb 95
Next Stories
1 Video: ‘मग तुम्ही स्टार किड्सचे चित्रपट पाहायला जाऊ नका’, करीनाचे घराणेशाहीवर वक्तव्य
2 तिची प्रतीक्षा संपली! ज्या गोष्टीसाठी २० वर्ष पाहिली वाट ती अक्षयने केली पूर्ण
3 ‘कथा चांगली आहे पण…’, सतीश यांच्या फोटोवर रुचिर शर्मा यांची टीका
Just Now!
X