18 February 2019

News Flash

‘या’ कोट्याधीशला डेट करतेय आलिया भट्ट?

पुन्हा एकदा आलिया तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. सध्या आलिया तिच्या आगामी गली बॉय सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंगही दिसणार आहे. यानंतर ती रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्र सिनेमात दिसणार आहे. आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ब्रेकअपनंतर रणबीर आणि तिच्यात जवळीक निर्माण झाली अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. रणबीर आणि आलिया डेट करत असल्याचेही अनेकांनी सांगितले. पण पुन्हा एकदा आलिया तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

‘मिड डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आलिया सध्या हाइक मॅसेंजरचा संस्थापक केविन मित्तलला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी आलिया आणि केविन यांना एकत्र पाहण्यात आले. या दोघांची पहिली ओळख ऑक्टोबर २०१७ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान झाली. केविन हा भारती एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल यांचा मुलगा आहे. हाइक मॅसेंजरचा संस्थापक याच नावाने केविन प्रसिद्ध आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

लंडनमधील एम्पेरियल कॉलेजमध्ये त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. पदवीनंतर केविनने भारती एण्टरप्रायझेसमध्ये काम करायला सुरूवात केली. याआधी त्याने गुगल आणि गोल्डमॅनमध्ये इंर्टनशिप केली होती. काही दिवसांपूर्वी आलिया आणि कतरिना कैफ एका चॅट शोमध्ये एकत्र गेले होते. या शोमध्ये गप्पा मारताना आलिया म्हणाली की, कतरिना कोणत्याच प्लॅनबद्दल गंभीर नसते. याचा तिला फार राग येतो. तर आपल्याआधी आलियाने लग्न करावे अशी इच्छा कतरिनाने व्यक्त केली.

First Published on February 9, 2018 6:00 pm

Web Title: is alia bhatt is dating billionaire hike massenger founder kevin mittal