News Flash

अनुष्का शर्माचा भाऊ आहे ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात?, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

कर्णेश शर्माने शेअर केलेले फोटो सध्या चर्चेत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चत असते. कधी ती चित्रपटांमधील भूमिकांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे अनुष्का चर्चेत असते. आता सध्या अनुष्काचा भाऊ चर्चेत आहे. लाइमलाइटपासून लांब असणारा अनुष्काचा भाऊ कर्णेश शर्मा एका अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याचे म्हटले जात आहे. त्या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

निर्माता कर्णेश शर्मा हा अभिनेत्री तृप्ती डिमरीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तृप्तीने ‘बुलबुल’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाची निर्मिती कर्णेशच्या होम प्रोडक्शनने केले होती. त्या दोघांची ओळख या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. आता ते दोघेही सोशल मीडियावर एकत्र वेळ घालवतानाचे फोटो शेअर करताना दिसतात. त्यामुळे कर्णेश तृप्तीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा : ‘शाहरुखसोबत बीडी शेअर करायचो’, मनोज वाजपेयीने सांगितला किस्सा

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

आणखी वाचा : पुणे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला

कर्णेश आणि तृप्तीला त्यांच्या रिलेशनबद्दल बऱ्याच वेळा विचारण्यात आले आहे. मात्र त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पण काही दिवसांपूर्वी अनुष्काने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला शेअर केलेल्या फोटोमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या फोटोमध्ये अनुष्कासोबत कर्णेश आणि तृप्ती दिसत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

तृप्तीने २०१७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती अभिनेता श्रेयस तळपदेसोबत ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर तिने ‘लैला मजनू’ चित्रपटात काम केले. आता लवकरच तृप्ती ‘अॅनिमल’ आणि ‘काला’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 7:08 pm

Web Title: is anushka sharma brother karnesh dating actress tripti dimri avb 95
Next Stories
1 भाईजानला अब्बूजानकडूनच निगेटिव्ह रिव्ह्यू ; सलीम खान म्हणाले, “राधे चित्रपट काही…”
2 किम कार्दशियन अडकली वादात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
3 ‘मिर्झापूर’च्या बबलू पंडितने अ‍ॅमेझॉन प्राइमकडे केली तक्रार; फॅन्सनी विचारलं, “नेटफ्लिक्सने सांगितलंय का ?”
Just Now!
X