News Flash

अथिया शेट्टी व केएल राहुल इंग्लंडमध्ये एकत्र? इन्स्टा पोस्टनंतर चाहत्यांमध्ये चर्चा

अथियाने तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधान आलं आहे.

अथिया आणि केएल राहुल एकत्र असल्याच्या चर्चांना उधान. (Photo Credit : Athiya Shetty Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी तिच्या चित्रपटांपेक्षा क्रिकेटर केएल राहुलसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. केएल राहुल आणि अथियाने त्यांच्या नात्याविषयी कधीच पुढे येऊन काही सांगितले नाही. तरी, या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं असतात. दरम्यान, अथियाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अथिया ही केएल राहुल आणि भारतीय टीमसोबत आहे असे चित्र दिसतं आहे.

आणखी वाचा : Video : असा साजरा केला शिल्पा शेट्टीने आपला ४६ वा वाढदिवस

अथियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. अथियाचा हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो आहे. हा फोटो पाहिल्यानंतर ती इंग्लंडमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हा फोटो शेअर करत ‘तुमची एनर्जी वाचवा’, अशा आशयाचे कॅप्शन अथियाने दिले आहे. हे पाहता नेटकऱ्यांनी अथियाला प्रश्न विचारला की ती इंग्लंडमध्ये केएल राहुल सोबत आहे का. अथियाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

खरतरं ही चर्चा केएल राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोमुळे सुरु झाली. केएल राहुल आणि अथियाच्या फोटोच बॅकग्राऊंड सेम आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul (@rahulkl)

आणखी वाचा : राखीला किस ते दुबईमध्ये जेलची हवा, जाणून घ्या मिका सिंगच्या कॉन्ट्रोव्हर्सी

दरम्यान, सध्या भारतीय क्रिकेट टीम ही न्यूझीलंड संघा विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 12:50 pm

Web Title: is athiya shetty with rumoured boyfriend kl rahul in england dcp 98
Next Stories
1 कोण ठरेल महाराष्ट्राची महागायिका?; सूर नवा ध्यास नवा-आशा उद्याची “महाअंतिम सोहळा”
2 ‘फॅमिली प्लॅनिंगबद्दल काय विचार?’ चाहत्याच्या प्रश्नाला अंकिताचे मजेशीर उत्तर
3 ह्रतिक रोशनची एक्स वाईफ सुझान खानचा नवा लूक; शेअर केला व्हिडीओ
Just Now!
X