26 September 2020

News Flash

१८ वर्षे मोठ्या सहकलाकाराला डेट करतेय ‘ही’ अभिनेत्री

ती आता १८ वर्षांची असून, मनीष हा ३६ वर्षांचा आहे.

प्रेमात माणूस आंधळा होतो. तसेच प्रेमाला वयाचे बंधन नसते, असे म्हटले जाते. टीव्ही अभिनेत्री अविका कौर हिने यावर जरा जास्तच विचार केलेला दिसतोय.
बालिका वधू या मालिकेतून छोट्या आनंदीच्या भूमिकेने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अविका गोर तिच्या सहकाराला डेट करत असल्याचे वृत्त आहे. आपल्या ऑनस्क्रीन पतीला अविकाने ऑफस्क्रीनही स्वीकारल्याचे दिसतेय. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील सहकलाकार मनीष रायसिंघानी याला अविका डेट करत असल्याचे कळते. शूटिंगनंतरही हे दोघे जास्तीत जास्त एकत्र वेळ घालवत असून अनेक ठिकाणी ते एकत्र दिसतात. या दोघांच्याही सोशल हॅण्डलवर नजर टाकल्यास यांच्यात मैत्रीपेक्षाही खूप काही असल्याचे दिसून येते. अविका आता १८ वर्षांची असून, मनीष हा ३६ वर्षांचा आहे. त्यामुळे प्रेमाला वयाचे बंधन नसते हे खरंच या दोघांनी मनावर घेतल्याचे दिसते. माज्ञ, या दोघांनीही अद्याप आपल्या प्रेमासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 11:38 am

Web Title: is balika vadhu avika gor dating manish raisinghan who is 18 years older to her
Next Stories
1 राहुल राजने प्रत्युषाचे लाखो रूपये उडवले; प्रत्युषाच्या पालकांचा आरोप
2 ‘कान’साठी रिंगण’, हलाल वक्रतुंड महाकायची निवड
3 कागदपत्र तपासणीसाठी अक्षयकुमारची रखडपट्टी
Just Now!
X