News Flash

भोजपूरी स्टार आम्रपाली दुबे दिसणार ‘बिग बॉस १४’मध्ये?

याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही..

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस.’ आता लवकरच ‘बिग बॉस १४’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण बॉलिवूडचा भाईजाना सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या रिअॅलिटी शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता भोजपूरी अभिनेत्री बिग बॉस १४मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

बिग बॉस १४साठी निर्मात्यांनी भोजपूरी अभिनेत्री आम्रपाली दुबेला विचारण्यात आले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण निर्माते किंवा अभिनेत्री यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

#throwback #clubbingtimes #chhodaayehumvohgaliyan

A post shared by Dubey Aamrapali (@aamrapali1101) on

आणखी वाचा : ‘बिग बॉस १४’साठी सलमान घेणार इतके मानधन?

यंदाच्या बिग बॉस १४ची थीम काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शोमध्ये निया शर्मा, विवियन डिसेना, सुगंधा मिश्रा, अविनाश मुखर्जी, शिरीन मिर्जा, सौम्या टंडन हे कलाकार दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच बिग बॉस १४मध्ये स्पर्धकांनी एण्ट्री करण्यापूर्वी करोना चाचणी करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 7:33 pm

Web Title: is bhojpuri star amrapali dubey is going to participate in bigg boss 14 avb 95
Next Stories
1 “स्टंटबाजीसाठी काहीही बोललेलं महाराष्ट्रातील माणूस खपवून घेणार नाही”
2 “पबजीवाल्यांनो आता कुठलं कारण द्याल?” केंद्राच्या निर्णयावर आभिनेता खुश
3 “मुंबईला रक्ताचं व्यसन लागलंय”: कंगनाचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
Just Now!
X