News Flash

‘बिग बॉस’ने राखीला दिली २५ लाख रुपयांची कार भेट?

सध्या राखीचा व्हिडीओ चर्चेत आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. नुकताच राखी छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १४’मध्ये दिसली होती. तिने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन देखील केले आहे. पण टॉप ५मध्ये पोहोचल्यावर राखीने शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता राखीला बिग बॉसने गाडी गिफ्ट म्हणून दिली असल्याचे समोर आले आहे.

‘इन्स्टा बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजने राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी एका कारजवळ उभी आहे. राखीला ही नवी कार बिग बॉसने भेट म्हणून दिल्याचे ती बोलताना दिसत आहे. ‘बिग बॉसने मला २५ लाख रुपयांची कार दिली आहे’ असे राखी बोलत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

‘बिग बॉस १४’च्या घरात राखी सावंतने चॅलेंजर म्हणून एण्ट्री केली होती. राखीने बिग बॉसच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्थान पटकावले होते. त्यानंतर तिने १४ लाख रुपये घेऊन फिनालेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे मिळालेले पैसे आईच्या उपचारासाठी वापरणार असल्याचे राखीने फिनालेमध्ये म्हटले होते. काही दिवसांपूर्वी राखीच्या आईला कॅन्सर झाल्यामुळे मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राखीला सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खानने यांनी आर्थिक मदत केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 3:03 pm

Web Title: is big boss gave car as a gift to rakhi sawant avb 95
Next Stories
1 होळीच्या रंगात रंगला तैमूर, बहिणीसोबत होळी खेळतानाचे फोटो व्हायरल
2 ‘वाथी कमिंग’वर शशांकचा भन्नाट डान्स, पत्नी प्रियांका म्हणाली डान्स शिकण्याची गरज
3 मुस्लिम असल्यामुळे भरतनाट्यम शिकवण्यास गुरुजींनी दिला होता नकार, वहीदा रहमान यांचा खुलासा
Just Now!
X