News Flash

Photos: दीपिका- रणवीरने सुरू केली लग्नाची खरेदी

अचानक दागिन्यांच्या शोरुम जाणाऱ्या दीपिकाला पाहून तिच्या लग्नाच्या चर्चा या फक्त अफवा नसल्याचे स्पष्ट होते

सोनम कपूर, नेहा धुपिया, हिमेश रेशमिया यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूड प्रेमींना दीपिका- रणवीरच्या लग्नाचे वेध लागले आहेत. असे म्हटले जाते की, यावर्षी दीपिका आणि रणवीर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. साधारणपणे १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान हे प्रेमी युगुल लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतेच दीपिकाला एका दागिन्यांच्या शोरुममधून बाहेर पडताना पाहण्यात आले.

दीपिका तिच्या आईसोबत दागिन्यांच्या शोरुम बाहेर पडताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. अचानक दागिन्यांच्या शोरुम जाणाऱ्या दीपिकाला पाहून तिच्या लग्नाच्या चर्चा या फक्त अफवा नसल्याचे स्पष्ट होते. दीपिका तनिष्कच्या शोरुममध्ये गेली. या दागिन्यांच्या ब्रॅण्डची दीपिका ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. या बॅण्डच्या जाहिरातीमध्ये याआधी दीपिका तिच्या आईसोबत झळकली आहे.

यामुळे या ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी दोघी शोरुममध्ये गेले की लग्नाच्या खरेदीसाठी गेले हे अद्याप कळू शकलेले नाही. पण असे म्हटले जाते की, दीपिका आणि रणवीरच्या लग्नासाठी श्रीलंका किंवा स्वित्झलँड या दोनपैकी एका ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग करतील. दीपिका आणि रणवीर अनेकदा श्रीलंकेला एकमेकांसोबत वेळ घालवण्यास जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 7:11 pm

Web Title: is deepika padukone marriage preparations begin she spotted outside a jewellery store with mother
Next Stories
1 सलमानचे संपूर्ण कुटुंब आहे या क्रिकेटपटूचे वेडे
2 Top 5: बॉलिवूडचे हे कोट्याधीश स्टार आजही वापरतात स्वस्त गाडी
3 लग्नाचं प्रपोजल देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीला रवीना म्हणाली…
Just Now!
X