छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे दिव्यांका त्रिपाठी. दिव्यांका सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी’ सिझन ११चे चित्रीकरण करत आहे. या शोच्या चित्रीकरणासाठी ती दक्षिण अफ्रिका येथील केप्टाउन येथे गेली आहे. काही दिवसांपूर्वी तिची ‘ये है मोहब्बते’ ही मालिका आली होती. या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती. पण तुम्हाला माहिती आहे का दिव्यांकाला तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेची देखील ऑफर आली होती. मात्र दिव्यांकाने मालिकेला नकार दिला होता.

‘कोईमोई’ने दिलेल्या वृत्तानुसार, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहका का उल्टा चष्मा’मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी दिव्यांका त्रिपाठीला ऑफर आली होती. पण तिने ही भूमिका करण्यास नकार दिला होता. पण दिव्यांकाने यावर कधीही वक्तव्य केले नाही.

Love Sex Aur Dhokha 2 to feature trans woman Bonita Rajpurohit
एकेकाळी १० हजार रुपये महिन्याने करायची काम, आता ट्रान्सवूमन बोनिता एकता कपूरच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
aarti singh wedding rumors (1)
लाल साडी, केसात गजरा अन् घरी सजावट! गोविंदाच्या भाचीच्या लग्नाची तयारी सुरू, अभिनेत्रीने शेअर केले फोटो

आणखी वाचा : ‘एकाचे कर्म, दुसऱ्याचे भविष्य’, समांतर २चा ट्रेलर प्रदर्शित

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे. गर्भवती असताना तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. ४ वर्षे उलटली तरी देखील चाहते तिची प्रतिक्षा करत आहेत. पण मालिकेत दिशा वकानी परत दिसणार की आणखी कोणती दुसरी अभिनेत्री दयाबेनच्या भूमिकेत दिसणार हे पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

मालिकेचे निर्माते आसित मोदी यांनी दयाबेनच्या वापसीवर एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केले होते. ‘खरं सांगू तर मला मनापासून वाटते आणि चाहत्यांना देखील वाटते की दयाबेन परत यावी. त्यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम प्रयत्न करत आहे’ असे उत्तर त्यांनी दिले होते.