18 January 2021

News Flash

फरहान अख्तर शिबानी दांडेकरला करतोय डेट?

२०१५ पासून फरहान व शिबानी एकमेकांना ओळखतात. एका शोदरम्यान या दोघांमध्ये मैत्री झाली.

फरहान अख्तर, शिबानी दांडेकर

बॉलिवूडमध्ये ब्रेक- अप आणि लिंक- अपच्या चर्चा नेहमीच होत असतात. पत्नी अधुनासोबत घटस्फोट घेतल्यानंतर फरहान आणि श्रद्धा कपूर यांच्यात अफेअर असल्याचं म्हटलं जात होतं. श्रद्धा कपूरशी ब्रेक- अप झाल्यानंतर आता फरहान अभिनेत्री आणि गायिका शिबानी दांडेकरला डेट करत असल्याची माहिती आहे.

२०१५ पासून फरहान आणि शिबानी एकमेकांना ओळखतात. एका शोदरम्यान या दोघांमध्ये मैत्री झाली. फरहान जो शो होस्ट करत होता. शिबानी त्या शोचा भाग होती़. काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये फरहान आणि शिबानीला एकत्र पाहिलं गेलं. याआधीही बऱ्याचदा दोघांना एकत्र पाहिलं गेलं. अर्थात दोघांनीही हे नातं अद्याप मान्य केलेलं नाही.

वाचा : अॅमेझॉन प्राइम ओरिजिनलवर लवकरच येणार ‘कॉमिकस्तान’चा दुसरा सिझन 

‘रॉक ऑन २’ या चित्रपटानंतर बी- टाऊनमध्ये अभिनेता फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्र पाहिलं गेलं आणि इतकंच नव्हे तर फरहानच्या घरी श्रद्धा लिव्ह इनमध्ये राहत असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र, त्यांच्या या रिलेशनशिपला श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांची सुरुवातीपासूनच संमती नव्हती. फरहानच्या घरातून ते श्रद्धाला घेऊन गेले होते. या सर्व घटनांनंतर तिनेही फरहानपासून लांब राहण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 5:31 pm

Web Title: is farhan akhtar in a relationship with shibani dandekar
Next Stories
1 ‘भाडीपा’च्या व्हिडिओत झळकणार अबिश मॅथ्यू; म्हणतोय, ‘भाऊ… मीपण मराठी’
2 उपचारांसाठी मित्राला आर्थिक साहाय्य करा, सनीचं सोशल मीडियाद्वारे आवाहन
3 Home Sweet Home : रिमा लागू यांच्या शेवटच्या चित्रपटाची झलक पाहिली का?
Just Now!
X