22 February 2019

News Flash

‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख या सह-कलाकाराला करतेय डेट?

'दंगल' चित्रपटातील सहकलाकाराला ती डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

फातिमा सना शेख

‘दंगल’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री फातिमा सना शेख नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. सध्या फातिमा तिच्या अफेअरसंदर्भातील बातम्यांमुळे चर्चेत आहे. ‘दंगल’ चित्रपटातील सहकलाकाराला ती डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. हा अभिनेता आहे अपारशक्ती खुराना. ‘दंगल’मध्ये अपारशक्तीने फातिमाच्या चुलत भावाची भूमिका साकारली होती.

अपारशक्ती हा अभिनेता आयुषमान खुरानाचा भाऊ आहे. फातिमाचे त्याच्यासोबत फिरतानाचे फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. फातिमाने ‘दंगल’मध्ये गीता फोगटची भूमिका साकारली होती. तर अपारशक्ती तिचा चुलत भाऊ ओमकारच्या भूमिकेत दिसला होता.

View this post on Instagram

Black on black

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on

Video : असा साकारला ‘मुन्ना भाई’चा लूक

फातिमा सध्या आमिर खानसोबत ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची शूटिंग सुरू झाली त्यादरम्यान फातिमाचं नाव आमिरसोबतंही जोडलं जात होतं. या चर्चांमुळे आमिरची पत्नी किरण राव अस्वस्थ असल्याचंही कानावर आलं होतं.

First Published on July 11, 2018 4:39 pm

Web Title: is fatima sana shaikh dating dangal co star aparshakti khurana