News Flash

आणखी एका अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, १२ वर्षांनी लहान आहे प्रियकर

तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चा सुरु झाल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. या चर्चा ती संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद दरबारला डेट करत असल्यामुळे सुरु झाल्या होत्या. आता गौहरचा साखरपुडा झाला असल्याचे म्हटले जात आहे.

नुकताच गौहरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती झैद दरबारसोबत दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर झैदने पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. या फोटोमध्ये ते दोघे एकमेकांकडे बघत असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

@zaid_darbar

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan) on

हा फोटो शेअर करत गौहर खानने अंगठीचा इमोजी वापरला आहे. त्यामुळे गौहरचा साखरपूडा झाला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान गौहर आणि झैद २५ डिसेंबरला लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. लग्नाच्या दोन दिवस आधी सर्व विधी करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच या लग्नसोहळ्यासाठी काही मोजक्याच लोकांना बोलवण्यात येणार असल्याचे म्हटले जाते.

कोण आहे झैद?
‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ यांसारख्या चित्रपटांना दमदार संगीत देणारे इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद हा डान्सर आहे. सोशल मीडियावर झैदचे अनेक फॉलोअर्स असून तो आधी टिकटॉक स्टार होता. झैद आणि गौहर यांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 12:26 pm

Web Title: is gauhar khan gets engaged avb 95
Next Stories
1 ‘ही खरी लक्ष्मी’; नऊवारी साडीतील प्रसाद ओकच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस
2 ‘तारक मेहता..’मधील जेठालालचा हा डायलॉग अडकला होता वादाच्या भोवऱ्यात
3 योगायोग म्हणावं की काय? अली फजलच्या घरातही आहेत गुड्डू आणि बबलू
Just Now!
X