27 February 2021

News Flash

‘घाडगे & सून’ फेम भाग्यश्री व भूषण प्रधानमध्ये नेमकं काय शिजतंय?

भाग्यश्री व भूषणच्या या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

भूषण प्रधान, भाग्यश्री लिमये

आपल्या लाडक्या कलाकाराच्या खासगी आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांना नक्कीच असते. कलाकारांच्या खासगी आयुष्याचे किस्से अनेकदा चवीने चघळल्या जातात. सध्या अशाच एका मराठी कलाकारांच्या जोडीबद्दल कलाविश्वात व सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ‘घाडगे & सून’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे. भाग्यश्रीचा हा फोटो आहे अभिनेता भूषण प्रधान याच्यासोबतचा. या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन पाहून या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

‘असा व्यक्ती जो मला आवडतो…आमच्या मागे उभा असलेला नव्हे…’, असा गमतीशीर कॅप्शन भाग्यश्रीने भूषणसोबतच्या फोटोला दिला आहे. अनेकांनी या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तुमची जोडी खूप छान दिसते, असंही अनेकांनी म्हटलंय. हा फोटो एका कार्यक्रमातील असल्याचं दिसतंय. पण भाग्यश्री व भूषणच्या जोडीकडे पाहून चाहत्यांनी आताच शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.

भाग्यश्रीने २०१७ मध्ये ‘घाडगे & सून’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत तिने साकारलेली अमृता प्रभुणेची भूमिका चांगलीच गाजली. त्यापूर्वी २०१४ मध्ये तिने ‘श्रावण क्वीन’चा किताब जिंकला होता. अभिनया क्षेत्रात येण्यापूर्वी ती आयटी कंपनीत नोकरी करत होती. तर दुसरीकडे भूषणने मराठी चित्रपट, वेब सीरिज व नाटकांमध्ये काम केलंय. भूषणने नुकताच ‘सर्वांत आकर्षक पुरुष’चा किताब जिंकला आहे. ‘आम्ही दोघी’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘सतरंगी रे’, ‘मिस मॅच’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 10:18 am

Web Title: is ghadge and sunn fame bhagyashree limaye dating bhushan pradhan ssv 92
Next Stories
1 ..त्या क्षणापासून बिग बींनी शशी कपूर यांची भेट घेणे टाळले
2 “औकातीत राहा…”, शिल्पा शेट्टीने लगावली पती राज कुंद्राच्या कानशिलात
3 Coronavirus : बिग बॉस स्पर्धकाला भेटणं चाहत्यांना पडलं भारी; होणार कायदेशीर कारवाई
Just Now!
X