26 September 2020

News Flash

हार्दिक पांड्या ईशा गुप्ताला करतोय डेट?

दोघांनी आपलं नातं जगापासून लपवून ठेवणंच पसंत केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक ईशाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

हार्दिक पांड्या सध्या बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता हिला डेट करत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर हार्दिक पांड्या सध्या बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता हिला डेट करत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र दोघांनीही आपल्या नात्याविषयी बोलण्यास नकार दिला आहे. याआधी उर्वशी रोतेला आणि एलीसोबतही हार्दिकचं नाव जोडलं गेलं.

बॉलिवूड आणि क्रिकेट हे नातं फार जुनं आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांच्यात प्रेमाचं सूत जुळल्याचं हे काही पहिलंच उदाहरण नाही. याआधी हरभजन गीता, युवराज- हेजल, विराट- अनुष्का, सागरिका- झहीर या जोड्या विवाहबंधनात अडकल्या. त्यामुळे आता हार्दिकदेखील याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या ईशाच्या प्रेमात हार्दिक असल्याच्या चर्चा आहे.

पण दोघांनी आपलं नातं जगापासून लपवून ठेवणंच पसंत केलं आहे. डीएनएच्या वृत्तानुसार सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना टाळणं दोघंही पसंत करतात. हे दोघंही एकमेकांच्या खूपच जवळ असून तूर्त तरी आपलं नातं लपवून ठेवण्यासाठी धडपड करत असल्याच्याही चर्चा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 11:38 am

Web Title: is hardik pandya dating esha gupta neither of them has spoken about the relationship
Next Stories
1 ..म्हणून बिग बींचा राग झाला अनावर
2 ‘भारतात क्रिकेटइतकं महत्त्व अन्य खेळांना दिलं जात नाही ही शोकांतिकाच’
3 FIFA World Cup : बिग बी, अभिषेक फुटबॉल सामना पाहण्यासाठी पोहोचले रशियात
Just Now!
X