22 January 2018

News Flash

आणखी एका अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा?

मी आता पुन्हा नव्याने संसार थाटावा अशी माझ्या पालकांची इच्छा आहे.

मुंबई | Updated: January 13, 2018 11:04 AM

अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाचे बार उडाल्याचेही दिसले.

क्रिकेटपूट विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुपचूप टस्कनी येथे डेस्टिनेशन वेडिंग केल्याचे नुकतेच पाहायला मिळाले. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाचे बार उडाल्याचेही दिसले. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी तसेच टेलिव्हिजन जगतातील कलाकार मंडळींच्या लग्नाचे वृत्त लागोपाठ ऐकावयास मिळत आहेत. त्यात आणखी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा केल्याचे वृत्त ‘पिंकव्हिला’ वेबसाइटने दिले आहे.

वाचा : फेअरनेस क्रीमची जाहिरात नको रे बाबा!

गुल खान हिच्या ‘इस प्यार को क्या नाम दू’ मालिकेत बरुण सोबती आणि सनाया इराणी यांच्यासह झळकलेली अभिनेत्री दलजीत कौर एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीला डेट करत असल्याचे म्हटले जातेय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा साखरपुडाही झाला असून, हे अरेन्ज मॅरेज असल्याचे समजते. पण, याविषयी दलजीतशी संवाद साधला असता तिने हे वृत्त फेटाळून लावत यात काहीच तथ्य नसल्याचे सांगितले. ती म्हणाली की, मी आता पुन्हा नव्याने संसार थाटावा अशी माझ्या पालकांची इच्छा आहे. त्यामुळे मी सध्या अरेन्ज मॅरेजच्या निमित्ताने बऱ्याच पुरुषांना भेटत आहे. याचा अर्थ माझा साखरपुडा झाला आहे असा होत नाही. त्या व्यक्तीला मी वर्षभरापूर्वी भेटले होते पण आमचे काही जमले नाही. इतकेच नव्हे तर आमच्यात साधी मैत्रीसुद्धा झाली नाही. माझ्या आयुष्यात नवीन जोडीदार आल्यावर मी स्वतःहून तुम्हाला त्याची माहिती देईन, असेही दलजीत म्हणाली.

वाचा : मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला नवा खलनायक

टेलिव्हिजन अभिनेता शालीन भानोत याच्याशी दलजीतचे लग्न झाले होते. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. अनेक वादविवादांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक मुलगा असून, त्याची जबाबदारी दलजीतनेच सांभाळली आहे. लग्न झाल्यानंतर आणि घटस्फोट घेतल्यावरही आयुष्यात अनेक उतारचढाव पाहावे लागले, असे दलजीतने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितले आहे. घटस्फोट घेत असताना मुलाचा ताबा मिळवण्यासाठीही तिला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले होते.

Some memorable time ❤️❤️

A post shared by DALLJIET KAUR (@kaurdalljiet) on

First Published on January 13, 2018 11:04 am

Web Title: is iss pyaar ko kya naam doon fame dalljiet kaur secretly engaged the actor responds
  1. No Comments.