सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटाची तुलना हॉलिवूडपट ‘लिटल बॉय’सोबत करण्यात आली होती. मात्र दिग्दर्शक कबीरच्या मते त्यांनी या चित्रपटाची केवळ संकल्पना घेतली आहे. आता शाहरूखचा ‘जब हॅरी मेट सेजल’सुद्धा हॉलिवूडची कॉपी असल्याचं म्हटलं जातंय.

शाहरूख खान आणि अनुष्का शर्माचा आगामी सिनेमा ‘जब हॅरी मेट सेजल’चं jab harry met sajal नाव शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यासोबतच सिनेमाचे काही पोस्टरसुद्धा प्रदर्शित झाले. सिनेमाचे नाव ऐकताच अनेकांना ऐंशीच्या दशकातील अमेरिकन रोमॅण्टिक कॉमेडी ‘व्हेन हॅरी मेट सॅली’ when harry met sally या सिनेमाशी साधर्म्य असल्याचे जाणवले. सिनेमांच्या नावातील साधर्म्य लक्षात घेता कथासुद्धा सारखीच असेल अशी चर्चा होऊ लागली. मात्र हे खोटं असल्याचं शाहरूखने स्पष्ट केलं आहे.

वाचा : प्रियांका चोप्राने खरंच केलीये का नाकाची सर्जरी?

‘या दोन सिनेमांमध्ये अजिबात साधर्म्य नाही. व्हेन हॅरी मेट सॅली ही जागतिक सिनेमांच्या इतिहासातील एक महान अशी प्रेमकथा आहे. दोन्ही सिनेमांच्या कथेत अजिबात साधर्म्य नाही. मात्र त्या सिनेमाप्रमाणेच माझाही सिनेमा खूप प्रसिद्ध होईल अशीच आशा आहे,’ असं शाहरूखने माध्यमांना स्पष्ट केलं.

वाचा : सलमानच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाचे उदघाटन

‘जब हॅरी मेट सेजल’मध्ये शाहरूख एक पंजाबी गाइडची भूमिका साकारणार आहे. ज्याचे नाव हरविंदर सिंह नेहरा असे आहे. चित्रपटात त्याला सगळे हॅरी या नावाने बोलावतात. तर अभिनेत्री अनुष्का गुजराती मुलगी सेजलची भूमिका साकारणार आहे. सेजल युरोपला फिरायला गेली असता तिची ओळख हॅरीसोबत होते आणि त्यानंतर दोघे कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात हे यात दाखवले आहे. आता हा सिनेमा हॉलिवूडची कॉपी आहे की नाही हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजू शकेल.