अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. पण गेल्या काही दिवसांपासून जॅकलिन एका बिझनेसमॅनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता जॅकलिनने नवे घर खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने जॅकलिनने नवे घर खरेदी केल्याचे म्हटले आहे. ‘जॅकलिनच्या आयुष्यात मिस्टर राइटचं आगमन झालं आहे. त्याच्यासोबत राहण्यासाठी जॅकलिन नवे घर शोधत आहे. जुहूमध्ये १७५ कोटी रुपयांचे नवे घर जॅकलिनने खरेदी केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत’ असे त्याने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘चोली के पीछे…’ गाण्याच्या वेळी सुभाष घई यांची मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटली होती लाज

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार जॅकलीनचा बॉयफ्रेंड हा दक्षिणेकडील एक उद्योजक असून ते दोघे मुंबईत एकत्र राहण्यासाठी नव्या घराच्या शोधात होते. आता जॅकलिनने जुहू येथे नवे घर खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, जॅकलीन नुकतीच रॅपर बादशहाच्या एक अल्बममध्ये झळकली होती. ‘पानी पानी’ हा बादशाहचा अल्बम चांगलाच हिट ठरत आहे. या गाण्यातील जॅकलीनच्या अदांवर चाहते घायाळ झाले आहेत. तर या आधी देखील बादशहा आणि जॅकलीनच्या ‘गेंदा फूल’ या अल्बमला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती.