18 October 2019

News Flash

‘या’ फॅशन डिझायनरला करण जोहर करतोय डेट?

हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

करण जोहर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता करण जोहरची नेटवर सध्या चर्चेचा सुरु आहे. या चर्चांची सुरुवात प्रसिद्ध डिझायनर प्रबळ गुरुंगने शेअर केलेल्या फोटोमुळे झाली आहे. या फोटोवरुन करण जोहर प्रबळला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच आता करण लग्न बंधनात अडकणार की काय असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडयला सुरुवात झाली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अमेरिकी- नेपाळी फॅशन डिझायनर प्रबळ गुरुंगने करण जोहरच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम खात्यावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करण आणि प्रबळ ऐकमेकांजवळ उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना प्रबळने ‘प्यार किया तो डरना क्या. करण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे कॅप्शनमध्ये लिहिले होते. फोटोचे कॅप्शन पाहता चाहत्यांमध्ये गोंधळच उडाला होता. परंतु नंतर त्याच्या या पोस्टवर खुद्द करण जोहरने रिप्लाय दिला आहे. त्याने ‘स्वत:वर आवर घाल भावा’ अशी कमेंट केली आहे.

सध्या करण जोहर त्याचा आगामी चित्रपट ‘तख्त’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, रणवीर सिंह, विकी कौशल, करिना कपूर, भूमि पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

First Published on May 26, 2019 4:02 pm

Web Title: is karan johar is dating prabal gurung