20 January 2021

News Flash

पार्थ समथान करणार आलिया भट्टसोबत काम?

तो संजयलीला भन्साली यांच्या चित्रपट दिसण्याची शक्यता आहे.

टीव्ही क्वीन एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की २’मध्ये अनुराग बासुची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे पार्थ समथान. काही दिवसांपूर्वी पार्थ मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण पार्थने किंवा मालिकेच्या निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आता पार्थ बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्टसोबत चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार पार्थची एका चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याने कसौटी जिंदगी की ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पार्थ दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तो आलिया भट्टच्या अपोजिट एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. पार्थचा हा पहिला बॉलिवूड प्रोजेक्ट असणार आहे.

 

View this post on Instagram

 

Bangalore days

A post shared by Parth Samthaan (@the_parthsamthaan) on

३ ऑक्टोबर रोजी पार्थ कसौटी जिंदगी की मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग करणार असल्याचे म्हटले जाते. ही मालिका सुरुवातीला अतिशय लोकप्रिय ठरली होती. पार्थने कैसी ये यारिया या मालिकेत भूमिका साकारली होती. या मालिकेत त्याने माणिक मल्होत्रा हे पात्र साकारले होते. त्याला या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली होती. आता पार्थ लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे चाहते आनंदी असल्याचे पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 7:24 pm

Web Title: is parth samthaan to play alia bhatt lover in sanjay leela bhansali next avb 95
Next Stories
1 “अद्याप खूनाचा आरोप सिद्ध झालेला नाही”; कुब्रा सैतचा रियाला भक्कम पाठिंबा
2 Video : ‘बिना पायल के ही बजे घुंघरू’वर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स
3 ड्रग्स प्रकरणात संजना गलरानीला अटक; ४ दिवसांत दुसरी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात
Just Now!
X