काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रियांकाने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत निकसाठी एक पोस्ट शेअर केली होती. आता प्रियांका एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या चर्चा तिने निकला गाडीतून खाली उतरण्यास सांगितल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर प्रियांका आणि निकच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहेत. या चर्चा प्रियांकाने निकला अपशब्दांचा वापर करत कारमधून उतरण्यास सांगितल्यामुळे सुरु झाल्या आहेत. एकीकडे प्रियांका आणि निक यांच्यामध्ये वाद सुरु आहेत असे म्हटले जात आहे तर दुसरीकडे हे सर्व त्यांच्या आगामी चित्रपटाचा भाग असल्याचे म्हटले जात आहे.

हे सर्व प्रियांका आणि निकच्या रियल लाइफमधील नसून रिल लाइफशी संबंधीत असल्याचे समोर आले आहे. ‘डेली डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार निक आणि प्रियांका त्यांच्या आगामी चित्रपटाच्या टेक्स्ट फॉर यू (Text For You)च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटातील एका भागात प्रियांकाने असे केले आहे.

आणखी वाचा- प्रियांकाचा ग्लॅमरस लूक पाहून हृतिक झाला घायाळ; म्हणाला, तू तर…

‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात पहिल्यांदा प्रियांका आणि निक एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटातील एका सीन दरम्यान ते दोघे एकत्र कारमध्ये बसलेले असतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद होतो आणि प्रियांका अपशब्द वापरत निकला कारमधून खाली उतरवते. हा त्यांच्या आगामी चित्रपटाचा एक भाग आहे.