16 January 2021

News Flash

‘सेक्रेड गेम्स २’ लांबणीवर जाण्यामागचं नेमकं कारण तरी काय?

शूटिंग रखडल्याच्या चर्चांवर सैफने दिलं स्पष्टीकरण

सेक्रेड गेम्स २

बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनचे पोस्टर व टीझर प्रदर्शित होऊन आता महिना उलटून गेला. जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं म्हटलं जात होतं. पण अद्यापही प्रदर्शनाची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. ‘सेक्रेड गेम्स २’ लांबणीवर जाण्याची बरीच कारणं सांगितली जात आहेत. नेटफ्लिक्सला दुसरा सिझन तितका आवडला नाही म्हणून त्यात बदल करण्याच्या सूचना दिल्याचीही चर्चा आहे. तर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी व सैफ अली खान यांच्या तारखांमुळे चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचं कळतंय.

सैफ अली खान त्याच्या आगामी ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाच्या तर नवाजुद्दीन त्याच्या आगामी ‘बोले चुडियाँ’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याचं वृत्त होतं. हे दोघंही वेब सीरिजमधील मुख्य भूमिका असल्याने शूटिंग रखडल्याचं वृत्त एका वृत्तपत्राने दिलं होतं. त्यावर सैफने उत्तर दिलं, ‘आम्ही दोघं दुसऱ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहोत म्हणून सेक्रेड गेम्सचं दुसरं सिझन रखडल्याचं वृत्त तथ्यहीन आहे. आमच्या हातात दुसरे प्रोजेक्ट्स नक्कीच आहेत पण वेब सीरिजसाठी जेवढा वेळ हवा होता, तो आम्ही दिला आहे.’

वाचा : अटक प्रकरण पथ्यावर, बिचुकलेंनी महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे

आता ही सीरिज नेमकी कशामुळे लांबणीवर टाकली जात आहे हे निर्मातेच सांगू शकतील. २५ दिवसांत काय होणार? त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय असतो? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सीझनमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे चाहते मात्र दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत हे नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 12:42 pm

Web Title: is sacred games 2 delayed because of saif ali khan and nawazuddin siddiqui here is what saif says ssv 92
Next Stories
1 बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंग’ची सेंच्युरी!
2 Video : ‘ये बस’, दीपिकाने छायाचित्रकाराला दिले मजेशीर आमंत्रण
3 वडिलांसह सलमानची रंगली मैफिल, पाहा व्हिडीओ
Just Now!
X