News Flash

Akash Thosar :’सैराट’चा परश्या जाणार बॉलिवूडमध्ये?

आकाश महेश मांजरेकरांच्या मराठी सिनेमात दिसेल

बॉलिवूड सिनेमात आकाश ठोसर दिसणार का?

‘सैराट’ फेम आकाश ठोसर नुकताच ओमंग कुमारच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. ओमंगने ‘मेरी कोम’, ‘सरबजीत’ यांसारख्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ‘मेरी कोम’ या त्याच्या सिनेमाला तर राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. उमंग आता ‘दे धक्का’ या महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी सिनेमाचा लवकरच हिंदीत रिमेक बनवणार आहे. या सिनेमामुळे त्याचे मराठी सिनेसृष्टीशी संबंध जोडले गेले आहे.

पण त्याच्या वाढदिवसाला आकाश गेल्यानेअनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आकाश आता एखादा हिंदी सिनेमा करत आहे का अशीही चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. आकाश ‘सैराट’नंतर महेश मांजरेकर यांच्या एका मराठी सिनेमात काम करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. या सिनेमाचे शूटिंगही सुरु झाले. पण त्याने आतापर्यंत कोणत्याही हिंदी सिनेमात काम करण्यासाठी करार केला नव्हता.

ओमंगच्या वाढदिवसाला आकाश गेल्याने त्यानेही आता बॉलिवूडची वाट धरली असल्याचे चित्र दिसत आहे. ओमंगच्या या पार्टीत आकाश संदीप सिंगसोबत आला होता. संदीप ‘मेरी कोम’ या सिनेमाचा सहनिर्माता तर ‘सरबजीत’ या सिनेमाचा निर्माता होता. आकाश पार्टीतही सतत संदीपसोबतच होता. त्यामुळे एका दिग्दर्शकाच्या पार्टीत निर्मात्याबरोबर गेलेला आकाश लवकरच बॉलिवूडच्या एखाद्या सिनेमात झळकला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 1:00 am

Web Title: is sairat fame akash thosar is doing any bollywood movie
टॅग : Sairat
Next Stories
1 प्रियांकाच्या टी-शर्टवरील ‘त्या’ वादग्रस्त शब्दांचा मासिकाने केला खुलासा
2 … हे आहे रणवीरचे महिलांबद्दलचे मत
3 मॅडम बट बाजूला करुन पाहा, आरोप करणाऱ्या महिलेला परेश रावल यांचे फिल्मी स्टाइलने प्रत्त्युत्तर
Just Now!
X