22 July 2019

News Flash

आलियाचा एक्स बॉयफ्रेंड या नवोदित अभिनेत्रीला करतोय डेट?

ही अभिनेत्री करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा

‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्राची जोडी चांगलीच चर्चेत राहिली. या दोघांचं अफेअर आणि ब्रेकअप बी-टाऊनमध्ये सर्वांनाच माहीत आहे. आता आलिया रणबीर कपूरसोबत मूव्ह ऑन झाली आहे. तर सिद्धार्थलाही त्याचं नवं प्रेम मिळाल्याचं कळतंय. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’मध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री तारा सुतारिया आणि सिद्धार्थ यांच्यात काहीतरी शिजतंय हे नक्की.

सिद्धार्थ हा माझा क्रश आहे, असं ताराने याआधीही एका मुलाखतीत सांगितलं होतं. तारा आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असून अनेकदा बाहेर एकत्र फिरायलासुद्धा जात आहेत. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर २’मध्ये तारा टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेसोबत झळकणार आहे. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच ती सिद्धार्थसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तारा आणि सिद्धार्थ मुंबईतील वरळी इथं ‘बदला’ हा चित्रपट एकत्र पाहायला गेले होते.

याआधी तारामुळे टायगर श्रॉफ आणि त्याची कथित गर्लफ्रेंड दिशा पटानी यांच्यात दुरावा आल्याची चर्चा होती. तर ताराचं शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टरशीही नाव जोडलं गेलं आहे.

First Published on March 15, 2019 3:22 pm

Web Title: is siddharth malhotra and tara sutaria the new couple in b town