News Flash

‘तारक मेहता…’मधील ही अभिनेत्री सोडणार मालिका?

प्रेग्नंट असल्यामुळे तिने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, TMKOC, Roshan Sodhi, Jennifer Mistry, tv serial,
तिने या संदर्भात एका वृत्तावाहिनीला मुलाखत दिली आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिका सोडली. त्यानंतर अभिनेत्री सुनैना फौजदार अंजली भाभीची भूमिका साकारत आहे. आता नेहा पाठोपाठ आणखी एक अभिनेत्री मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील प्रत्येक पात्र हे चर्चेत असते. आता मालिकेतील रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सिवाला ही मालिका सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. जेनिफर ही प्रेग्नंट असल्यामुळे मालिका सोडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा : मालिका सोडल्यानंतर ‘तारक मेहता…’मधील अंजली भाभी काय करते? जाणून घ्या

या सर्व चर्चा सुरु असताना जेनिफरने एका वृत्तावाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये वक्तव्य करत तिने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘मी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे मला अनेकांनी फोन आणि मेसेज केले आहेत. तसेच मी प्रेग्नंट असल्यामुळे मालिका सोडत असल्याचे देखील म्हटले जात आहे. पण या सर्व अफवा आहेत’ असे जेनिफर म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘मला गेल्या काही दिवसांपासून बरं वाटत नाही. माझ्या पायाला दुखापत झाली आहे. मला चालता देखील येत नाही. त्यामुळे मी दमणला चित्रीकरणासाठी जाऊ शकले नाही. मी मालिकेच्या टीमच्या संपर्कात असते. पण लोक अशा अफवा का पसरवतात मला कळत नाही.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 4:18 pm

Web Title: is taarak mehta ka ooltah chashmah jennifer mistry quitting show avb 95
Next Stories
1 ‘फिल्स लाइक इश्क’ नेटफ्लिक्सचा नविन उपक्रम सहा लघुकथांची एक सिरिज
2 ‘भाग डीके बोस’ गाणं ऐकल्यानंतर आमिर म्हणाला होता, ‘तू माझं करिअर बर्बाद करणार आहेस…’
3 शिल्पा शेट्टी आणि परेश रावल यांच्या ‘हंगामा २’चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X