News Flash

नयनताराला मागे टाकत ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन?

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या यादीत नयनतारा अग्रस्थानी आहे.

छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या यादीत नयनतारा अग्रस्थानी आहे. ‘इमइक्का नोडिगल’, ‘कोलाइथुर कालम’, ‘जय सिम्हा’, ‘कोको’ या चित्रपटांतून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. २००३ मध्ये मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या नयनताराने आतापर्यंत अनेक मल्याळम, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र आता नयनताराला मागे टाकत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीची जागा मालविका मोहनन हिने घेतल्याचं समजतंय.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार मालविका पाच कोटी रुपये मानधन घेत असल्याचं कळतंय. तर नयनतारा ४ कोटी रुपये मानधन घेते. मालविकाने मल्याळम चित्रपटांतून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने रजनीकांत यांच्या ‘पेट्टा’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारत कॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजयच्या ‘मास्टर’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटामुळे तिला दमदार प्रसिद्धी मिळाली असून सोशल मीडियावरही ती चर्चेत आहे.

मालविकाने ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने आणखी एक बॉलिवूड चित्रपट साइन केला आहे. रवी उदयवार या चित्रपटाचे दिग्दर्शक असल्याचं कळतंय. त्यांनी श्रीदेवी यांच्या ‘मॉम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 6:05 pm

Web Title: is this actress getting a higher remuneration than nayanthara ssv 92
Next Stories
1 स्वरा भास्करच्या ‘रसभरी’ वेब सीरिजवरून भन्नाट मीम्स व्हायरल
2 फोटोतल्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? होती सुशांतची जवळची मैत्रीण
3 “सुशांतच्या आत्महत्येसंदर्भातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न”; अभिनेत्रीचा धक्कादायक आरोप
Just Now!
X