मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या साखरपुड्यासाठी बॉलिवूड कलाकारांची इटलीत उपस्थिती पाहायला मिळाली. इटलीतलं ‘लेक कोमो’ हे स्थळ साखरपुड्यासाठी निवडण्यात आलं आहे. स्वर्गाहून सुंदर जागा अशी प्रशंसा लेक कोमो परिसराची नेहमीच केली जाते. याच ठिकाणी दीपिका आणि रणबीर ही बॉलिवूडमधली प्रसिद्ध जोडीदेखील विवाह बंधनात अडकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या साखरपुड्यासाठी अनिल कपूर, मनिष मल्होत्रा, जान्हवी कपूर. प्रियांका चोप्रा, सोनम कपूर अशा अनेक बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. या बॉलिवूड कलाकारांमध्ये  ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि तिचा होणारा नवरा निक जोनास यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं.

प्रियांका आणि निकनं पारंपारिक भारतीय पेहरावात साखरपुड्यासाठी उपस्थिती लावली. या नव्या जोडप्याचे भारतीय पेहरावातले फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तर काळ्या रंगाच्या गाऊनमधली जान्हवी कपूरही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. देशातील मोठा उद्योग समूह असलेल्या पिरामल इंटरप्रायजेसचे अजय पिरामल यांचा मुलगा आनंद याच्याबरोबर ईशाचा विवाह होणार आहे. आनंद आणि ईशा जुने मित्र आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isha ambani engagement bash in italy priyanka chopra nick jonas and janhvi kapoor look beautiful
First published on: 22-09-2018 at 14:28 IST