News Flash

Video : इशान-जान्हवीचा हा आगळावेगळा ‘झिंगाट’ पाहिलात का?

गाणं प्रदर्शित होण्यापूर्वी जान्हवी आणि इशानने या गाण्यावर एक आगळावेगळा डान्स केला असून सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Video : इशान-जान्हवीचा हा आगळावेगळा ‘झिंगाट’ पाहिलात का?
जान्हवी-इशानचा 'झिंगाट' डान्स

कलाविश्वात सध्या शशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात इशान खट्टर आणि जान्हवी कपूर ही जोडी नव्याने पदार्पण करणार आहे. त्यामुळे साऱ्या कलाविश्वाचं आणि प्रेक्षकांचं लक्ष या दोघांवर असल्याचं दिसून येतं. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु असून काही दिवसापूर्वी चित्रपटातील ‘धडक है ना’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यानंतर आज बहुचर्चित ठरलेलं ‘झिंगाट’ हे गाणं प्रदर्शित होणार आहे. गाणं प्रदर्शित होण्यापूर्वी जान्हवी आणि इशानने या गाण्यावर एक आगळावेगळा डान्स केला असून सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या लाडक्या लेकीचा जान्हवी ‘धडक’ या चित्रपटातून पहिल्यांदाच कलाविश्वात पाऊल ठेवणार आहे. जान्हवीला मोठ्या पडद्यावर झळकताना पाहण्याची श्रीदेवी यांची प्रचंड इच्छा होती. मात्र चित्रपट प्रदर्शनापूर्वीच श्रीदेवी यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. मात्र आईची ही अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी जान्हवीने प्रचंड मेहनत घेतली असून तिला चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लोकप्रियता मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

सुपरहिट मराठी चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक असणाऱ्या ‘धडक’कडून प्रेक्षकांच्याही बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वीच इशान आणि जान्हवीने प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यासाठी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये हे दोघंही झिंगाट गाण्यावर थिरकत असून त्यांचा हा डान्स प्रचंड गमतीशीर असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र तरीदेखील हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.

दरम्यान, ‘धडक’ हा चित्रपट नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असून तो येत्या २० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘सैराट’ प्रमाणेच हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल असं एकंदरीत दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2018 11:56 am

Web Title: ishaan and janhvi dhadak zingaat today funny video
Next Stories
1 Lust Stories : हस्तमैथुनाच्या दृश्याविषयी कियारा म्हणते…
2 ‘सूर नवा ध्यास नवा- Little Champs’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 शाहरुखने इरफानला मदत केलीच नव्हती; लंडनमधल्या घराची किल्ली दिल्याच्या चर्चा खोट्या
Just Now!
X