News Flash

‘तू कोण आहेस…’, ईशान खट्टरवर आई नीलिमा संतापली

पाहा व्हिडीओ

(Photo credit : Ishaan katter Instagram)

बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर हा त्याच्या अभिनयकौशल्य आणि डान्ससाठी ओळखला जातो. ईशान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तो सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्याचे डान्स व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मात्र, ईशानने आता डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केलेला नाही. तर, आई नीलिमाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ईशानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून ईशानने लॉकडाउन दरम्यान घरात होणारी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओत नीलिमा या त्यांचे चॉकलेट ईशानने घेतल्याबद्दल चिडल्या आहेत. त्या ईशानला म्हणतात, ‘तू कोण आहेस, माझ्यासाठी अस करणारा?’ यावर ईशान म्हणतो, ‘चॉकलेटमुळे तुझं अडीच किलो वजन वाढलं आहे. त्यामुळे मी तुला चॉकलेट देणार नाही.’ तर नीलिमा म्हणतात, ‘मग मी योगा करणार नाही, आणि मी शाहिदकडे तुझी तक्रार करणार’ अशी धमकीही त्यांनी ईशानला दिली. व्हिडीओमध्ये नीलिमा ईशानला काहीही बोलत असल्या तरी ईशान त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishaan (@ishaankhatter)

‘बियॉन्ड द क्लाऊड’ हा ईशानचा पहिला चित्रपट होता. तर ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’ या चित्रपटातून ईशान प्रकाश झोतात आला होता. तर ‘सुटेबल बॉय’ नेटफ्लिक्सवरी या वेब सीरिजमध्ये ईशान एका वेगळ्या अंदाजात दिसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 10:49 am

Web Title: ishaan khatter gets scold by mom neelima azeem over chocolate s dcp 98
Next Stories
1 बिग बी अमिताभ बच्चन यांची नात पुन्हा ट्रोल, ‘त्या’ युजरला नव्या नंदा म्हणाली…
2 ‘पावरी’नंतर आता ‘पुलाव’ ट्रेंडमध्ये, ट्रोल करणाऱ्यांना मिळणार आता ‘या’ अंदाजात उत्तर
3 संगीतकार वाजिद यांची पत्नी मालमत्तेच्या वादामुळे न्यायालयात
Just Now!
X