28 September 2020

News Flash

अखेर स्वप्न पुर्ण झालं; अभिनेत्याने कतरिनासोबत काम करण्यासाठी पाहिली होती वर्षभर वाट

हा अभिनेता आहे कतरिनाचा खुप मोठा फॅन

आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री कतरिना कैफ आता एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘फोन भूत’ असं आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असेल असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात कतरिनासोबत अभिनेता इशान खट्टर आणि ‘गल्ली बॉय’ फेम सिद्धांत चतुर्वेदी देखील झळकणार आहे. इशान तर कतरिनासोबत काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक होता. त्याने जवळपास वर्षभर या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली होती.

अवश्य पाहा – धनुष उठा प्रहार कर; करोना पॉझिटिव्ह अभिषेकला बिग बींनी दिलं प्रोत्साहन

‘फोन भूत’च्या निमित्ताने मिड डेला दिलेल्या मुलाखतीत इशानने कतरिनाची प्रचंड स्तुती केली. “मी कतरिनाचा खुप मोठा फॅन आहे. या चित्रपटात मी करतरिनासोबत झळकणार आहे, हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिच्यासोबत काम करण्यासाठी मी वर्षभर आतुरतेने वाट पाहात होतो. ‘फोन भूत’ एक धमेकादार चित्रपट आहे. या चित्रपटात माझी कतरिनासोबतची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक नक्कीच आश्चर्यचकित होतील अशी मला खात्री आहे.” असं इशान या मुलाखतीमध्ये म्हणाला.

इशानने ‘फोन भूत’चं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. “भूतांना लॉकडाउनचे नियम लागू होत नाहीत. पण हा पोस्टर लॉकडाउनच्या आधीचा आहे.” अशी गंमतीशीर कॉमेंट त्याने या पोस्टरवर लिहिली आहे. वर्षाच्या सुरुवातीस या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं होतं. परंतु लॉकडाउनमुळे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबवण्यात आलं. परिणामी हा चित्रपट आता पुढल्या वर्षीच प्रदर्शित होईल. फरहान अख्तर या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 6:59 pm

Web Title: ishaan khatter katrina kaif phone bhoot siddhant chaturvedi mppg 94
Next Stories
1 शिल्पा शेट्टीने केला सासूबाईंसोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल
2 ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अनेक नव्या तरुणांना संधी मिळतील- अक्षय इंडीकर
3 लॉकडाउनमध्ये खेळायला प्लेस्टेशन मागणाऱ्या मुलाला सोनू सूदचे भन्नाट उत्तर
Just Now!
X