शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खत्तर ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवता दिसणार आहे. पण त्याआधी इशानची मुख्य भूमिका असलेला ‘बियाँड द क्लाउड’ हा चित्रपट ‘लंडन फिल्म फेस्टीव्हल’मध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातील आपल्या छोट्या भावाचं काम पाहून शाहिद खूपच खूश झाला आहे. एकीकडे बॉलिवूडमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी मी खूपच स्ट्रगल केला पण इशानला मात्र असा स्ट्रगल करावा लागणार नाही कारण तो माझा भाऊ आहे आणि याच जोरावर त्याला इण्डस्ट्रीत सहज काम मिळेल असं तो म्हणाला.

इशान सध्या ‘धडक’च्या चित्रिकरणात व्यग्र आहे. पण त्यापूर्वी त्याचा माजिद दिग्दर्शित ‘बियाँड द क्लाउड’ हा चित्रपट ‘लंडन फिल्म फेस्टीव्हल’मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहून शाहिदनं इशानच्या कामाचं भरभरून कौतुक केलं. ‘इशानचा या सिनेमातील अभिनय पाहून मी खूपच खूश आहे. मी वयाच्या २१ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये करिअरला सुरूवात केली. इशाननंही कमी वयात या इण्डस्ट्रीत पाऊल ठेवलं. मला बॉलिवूडमध्ये माझं स्थान बळकट करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. पण, इशानसाठी मात्र ते सहज सोप्प होतं. कारण लोक इशानला माझा भाऊ म्हणून ओळखतात आणि या जोरावर त्याला या इण्डस्ट्रीत कामं सहज मिळतील’ असं शाहिद एका मुलाखतीत म्हणाला.

इशानची मुख्य भूमिका असलेला ‘बियाँड द क्लाउड’ हा सिनेमा गेल्यावर्षी ‘लंडन फिल्म फेस्टीव्हल’मध्ये प्रदर्शित झाला. पुढच्या महिन्यात हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे. तर इशान जान्हवीची मुख्य भूमिका असलेल ‘धडक’ हा सिनेमा ६ जुलै २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे.