12 August 2020

News Flash

हिंदुस्तानी भाऊला ISI ने दिली जीवे मारण्याची धमकी; ट्विटरद्वारे धक्कादायक आरोप

हिंदुस्तानी भाऊला मारण्यासाठी ISIची माणसं भारतात आली?

बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आलेला हिंदुस्तानी भाऊ आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी तो चक्क आएसआईमुळे चर्चेत आहे. या पाकिस्तानी संस्थेने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असा धक्कादायक आरोप त्याने केला आहे.

काय म्हणाला हिंदुस्तानी भाऊ?

“आएसआईच्या लेफ्टिनेंट कर्नलने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले त्यांचे लोक आपल्या शहरात आले आहेत. ९२३४७३९९९३००, +४४७७५४५३४३२४ या नंबर्सवरुन मला धमकीचे फोन आले होते. त्यांची रेकॉर्डिंगसुद्धा मी केली आहे.” अशा आशयाचे ट्विट हिंदुस्तानी भाऊने केले आहे. त्याने आपले ट्विट्स मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांना देखील टॅग केले आहेत.

हिंदुस्तानी भाऊचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी हिंदूस्तानी भाऊ एकता कपूरमुळे चर्चेत होता. त्याने एकताच्या XXX या वेब सीरिजविरोधात पोलीस तक्रार केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 2:43 pm

Web Title: isi call to hindustani bhau mppg 94
Next Stories
1 आमिर खानच्या आईचा करोना रिपोर्ट आला, अभिनेत्यानं टि्वटरवर दिली माहिती
2 सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजना सांघीच्या नऊ तासांच्या चौकशीतून समोर आल्या ‘या’ गोष्टी
3 मला रडूच आलं हा व्हिडीओ बघून… सोनाली कुलकर्णी झाली भावूक
Just Now!
X